जनतेच्या रक्षकांना बालाजी संस्थानचे सुरक्षा कवच।
जालना । वार्ताहर
जनतेच्या रक्षणासाठी चोवीस तास रस्त्यांवर असलेल्या पोलीस बांधवांना कोरोना संसर्गजन्य आजारापासून वाचविण्यासाठी राम नगर परिसरातील बालाजी संस्थान ने पुढाकार घेतला असून सामाजिक कार्यात सदैव अग्रभागी असलेले संस्थान चे अध्यक्ष, प्रभाग संरक्षण दलाचे पोलीस मिञ गणेश जल्लेवार यांनी स्वखर्चाने पोलीस वाहनांची निर्जंतुकीकरण ङ्गवारणी मोहीम सुरू केली आहे.
मातृदिनाचे औचित्य साधून रविवारी (ता.10) गणेश चतुर्थी च्या मुहूर्तावर सोशल डिस्टन्सींग चे पालन करून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात निर्जंतुकीकरण ङ्गवारणी मोहीम सुरू करण्यात आली. सदर बाजार पोलीस ठाण्याचे पो. नि. संजय देशमुख, बालाजी संस्थान चे अध्यक्ष गणेश जल्लेवार पो. उप. नि .कोळसे, डॉ. कैलास सचदेव, राजू जल्लेवार,ज्ञानेश्वर अलकोंडा,दिनेश लोंकालकर,बालू गुल्लापेल्ली यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सध्या कोवीड-19 या संसर्गजन्य आजाराने सर्वञ थैमान घातले असून या महारोगाच्या कचाट्यात जनतेचे रक्षक असलेले पोलीस बांधव ही सापडले आहेत.सुदैवाने जालना पोलीस दलात कोरोनाचा शिरकाव झाला नाही. लॉकडाऊनच्या संकट काळात पोलीस यंत्रणेवरील ताण अधिक वाढल्याने कुटुंब दुर ठेवत दिवस - राञ जनतेच्या रक्षणासाठी जालना शहरातील प्रत्येक चौक,रस्त्यांवर पहारा देत आहेत .विशेष म्हणजे सर्व भागांत पोलीसांची वाहने ङ्गिरत असतात. या काळात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये व पोलीस बंदोबस्त करतांना त्यांचे आरोग्य सदृढ रहावे आणि विषाणूंपासून बचाव व्हावा ही दूरदृष्टी ठेवून गणेश जल्लेवार यांनी सर्वप्रथम पुढाकार घेत स्वखर्चाने पोलीसांची वाहने निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम हाती घेतली असून त्यांच्या या अभिनव उपक्रमाने संसर्गजन्य आजारापासून वाचविण्यासाठी पोलीस यंत्रणेस मोलाची मदत होईल अशी भावना पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी या वेळी व्यक्त केली. आज पहिल्या दिवशी सदर बाजार पोलीस ठाण्यातील (13) तेरा वाहने निर्जंतुकीकरण करण्यात आली. वेगवान पध्दतीने जिल्हा पोलीस दलातील जालना शहराच्या हद्दीत असलेल्या सर्व वाहनांची निर्जंतुकीकरण ङ्गवारणी करण्यात येईल असे बालाजी संस्थान चे अध्यक्ष गणेश जल्लेवार यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सुरू केलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
Leave a comment