काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांचा स्तुत्य उपक्रम 

भोकरदन । वार्ताहर

परप्रांतीय मजुर आणि कामगारांची होत असलेली ङ्गरङ्गट लक्षात घेऊन जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख यांनी मजूर आणि कामगारांना जालना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत नेऊन सोडण्यासाठी बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. श्री देशमुख यांच्या या स्तुत्य उपक्रमामुळे आपापल्या गावाकडे जाण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शेकडो मजूर आणि कामगारांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर जालना जिल्ह्यासह राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील उद्योग, व्यवसाय पूर्णपणे बंद पडले आहेत.याशिवाय छोटे मोठे व्यवसाय देखील बंद पडल्याने मजूर,कामगारांवर बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे.त्यात परप्रांतीय मजूर आणि कामगारांची आपापल्या राज्यात आणि गावाकडे परतण्यासाठी मोठी कुचंबना होत असल्याचे दिसून येत आहे. 

देशभरात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे रेल्वेसह सर्व वाहतूक व्यवस्था ठप्प झाली असून त्यामुळे भोकरदनसह जिल्ह्यात परप्रांतीय मजूर,कामगार मोठ्या प्रमाणात अडकून पडले आहेत. अन्य जिल्ह्यातील शेकडो मजूर ,कामगार आपल्या कुटुंबासह आपापल्या गावाकडे जाण्यासाठी पायपीट करत रस्त्याने जात असल्याचे दिसून येत आहे. शासनाकडून गावाकडे जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था केली जात नसल्याने हवालदिल झालेले शेकडो कामगार,मजूर सळसळत्या उन्हात अन्न पाण्याविना गावाकडे जाण्यासाठी पायपीट करत निघाल्याचे विदारक आणि मनाला चटका लावून जाणारे विदारक चित्र सध्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर पहावयास मिळत आहे. कामगार आणि मजुरांची होत असलेली ही ङ्गरपट थांबवण्यासाठी जालना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री राजाभाऊ देशमुख यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी भोकरदन येथील आपल्या गणपती इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थी बसेसद्वारे भोकरदन तालुक्यातील मजूर,कामगार आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जालना जिल्ह्याच्या सीमेपर्यंत स्वखर्चाने पोहचवण्यासाठी व्यवस्था केली आहे. राजाभाऊ देशमुख यांच्या या प्रयत्नांमुळे हजारो किलो मीटर पायपीट करत निघालेल्या शेकडो मजूर,कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना काहीसा दिलासा मिळणार असून देशमुख यांच्या या मानवतावादी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.