मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची मागणी 

जालना । वार्ताहर

कामगारांना मूळ गावी जाण्यासाठी कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदारांनी व्यवस्था न केल्याने पायपीट करणार्‍या कामगारांचा दुर्देवी मृत्यू झाला. कामगारांच्या बाबत निष्काळजीपणा दाखवल्या प्रकरणी कंपनी व्यवस्थापन आणि ठेकेदार यांना दोषी ठरवून त्यांच्याविरुद्ध कार्यवाही करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे  केली आहे.

करमाड - सटाणा शिवारात जालना औद्योगिक वसाहती त  काम करणार्‍या कामगारांना मालवाहू रेल्वेने शुक्रवारी ( ता. 08)पहाटे चिरडले. या दुर्देवी घटनेनंतर मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या लेखी निवेदनात म्हंटले आहे की, लॉकडाऊन मुळे कारखाने बंद असल्याने परप्रांतीय मजूर जालना शहरात थांबले होते.या काळात कंपनी व्यवस्थापन व ठेकेदाराने मजूरांकडे दुर्लक्ष करून वेतन ही रखडून ठेवले. तसेच मुळ गावी जाण्यासाठी व्यवस्था ही केली नाही. परिणामी हतबल झालेल्या मजूरांनी रेल्वे रूळाने पायपीट करत औरंगाबाद ( संभाजीनगर) ची वाट धरली. करमाड जवळ विसावा घेत असलेल्या या कामगारांसाठी काळ घेऊन पहाट उगवली.जालना औद्योगिक वसाहती तील अनेक कारखान्यांत परप्रांतीय मजूर मोठ्या प्रमाणात असून कंपनी व्यवस्थापन व ठेकेदारांनी त्यांचे वेतन ही रखडून ठेवले त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली असून वेळीच जाण्यासाठी व्यवस्था केली असती तर मजूरांना जीव गमवावे लागले नसते. असे नमूद करत मजूरांच्या मृत्यू प्रकरणी कंपनी व्यवस्थापन व ठेकेदार यांना जवाबदार धरून त्यांच्या विरूद्ध कार्यवाही करावी अशी मागणी राहुल रत्नपारखे यांनी केली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.