औरंगाबाद जिल्ह्यात 557 कोविडबाधित
घाटीत 50 वर्षीय कोविडबाधिताचा मृत्यू
औरंगाबाद । वार्ताहर
औरंगाबाद शहरातील नूर कॉलनीतील दोन मुले, दोन महिला, एक पुरूष, चिकलठाणा एमआयडीसी, भीम नगर आणि संजय नगरातील प्रत्येकी एक पुरूष असे एकूण आठ कोविडबाधितांची कोविड चाचणी निगेटीव्ह आली. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) त्यांना आज सुटी देण्यात आली. कोविडमुक्त झालेल्या या आठ जणांमुळे आतापर्यंत 73 जण कोविडमुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.
महापालिकेच्या कोविड केअर केंद्रांवरून 13 जण बरे झाल्याने त्यांना काल सुटी देण्यात आली. म्हणून कालपर्यंत एकूण 65 जण कोविडमुक्त होऊन घरी परतले. त्यात आज पुन्हा आठजण कोरोनामुक्त झाल्याने 73 जण कोरोनामुक्त झाले. तर आज औरंगाबाद शहरातील विविध भागातील 49 रुग्णांची नव्याने भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोविडबाधितांची संख्या 557 झाली. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 32 पुरूष, 17 महिलांचा समावेश आहे. यामध्ये (कंसात रुग्ण संख्या) राम नगर (19), सिल्क मिल कॉलनी (08), रोहिदास नगर (02), वसुंधरा कॉलनी, एन-7, सिडको (01), चंपा चौक (05), दत्त नगर (01), संजय नगर (01), अभय पुत्र कॉलनी, समता नगर (01), न्याय नगर, गल्ली नं.07 (05), असेफिया कॉलनी (01), बेगमपुरा (04), गुरूद्वारा जवळ, उस्मानपुरा (01) या परिरातील कोविडबाधितांचा समावेश आहे. मिनी घाटीत आज 37 जणांचा अहवाल निगेटीव्ह आलेला आहे. 46 जणांचा येणे बाकी आहे. सध्या मिनी घाटीमध्ये 89 कोविडबाधितांवर विशेष विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत, असेही मिनी घाटी प्रशासनाने कळवलेले आहे.
घाटीत 42 जणांवर उपचार सुरू, एकाचा मृत्यू
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत एकूण 41 रुग्णांची स्क्रीनिंग झाली. त्यापैकी 21 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले. घाटीच्या डेडिकेटेड कोव्हीड हॉस्पीटल (डीसीएच) 42 कोविड पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 41 रुग्णांची स्थिती सामान्य आहे. दोन रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तसेच 34 कोविड निगेटिव्ह रुग्णांवरही उपचार सुरु आहेत. एकूण 10 कोविड निगेटिव्ह रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुटी दिलेली आहे, असे अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी सांगितले.
उस्मानपुरा येथील गुरुव्दारा जवळील 56 वर्षीय पुरुष रुग्णाचा कोविड अहवाल आज पॉझिटिव्ह आलेला आहे. पुंडलिक नगर येथील 58 वर्षीय पॉझिटिव्ह पुरुष रुग्णास मिनी घाटी येथून घाटीत काल (दि.9 मे रोजी) संदर्भीत केलेले आहे. औरंगाबाद शहरातील रोशन गेट जवळील बायजीपुरा गल्ली क्रमांक तीन येथील 50 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह रुग्णाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, किडनीचाही आजार होता, असेही डॉ. येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे.
Leave a comment