ग्रामीण पोलिस अधीक्षकांनी केली कारवाई
खुलताबाद । वार्ताहर
तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे बनावट देशी, विदेशी दारू निर्मितीच्या कारखान्यावर चार दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छापा मारून कारखाना उद्ध्वस्त केला. बनावट दारू निर्मितीच्या कारखाना प्रकरणात पोलिस नाईक वाल्मीक कांबळे यांना ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी निलंबित केले आहे. खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे सोलापूर-धुळे राष्ट्रीयमहामार्गावरील एका शेतात बनावट देशी विदेशी दारू निर्मितीचा कारखाना सुरू होता. याबाबतची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने रात्री छापा मारून बनावट दारूचा कारखाना चालू असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी तीन दिवसांपूर्वी रात्री छापा मारून बनावट दारुचा कारखाना उद्ध्ववस्त केला होता. मुख्यम्हणजे तालुक्यातील हा सर्वात मोठा छापा सिद्ध झाला असुन या छाप्यात पोलिसांनी जवळपास 64 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गल्लेबोरगाव येथे बनावट देशी विदेशी दारु निर्मितीचा कारखाना हा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू होता. या बनावट दारु निर्मिती कारखान्याची माहिती पो.नाईक कांबळे यांना कशी मिळाली नाही. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते कार्यरत असतानाही माहिती मिळाली नसल्याचा ठपका ठेवून ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली.
Leave a comment