औरंगााबाद । वार्ताहर

शिवसेना संभाजीनगर व महानगरपालिका संभाजीनगर संयुक्त विद्यमाने (ता.11) मे पासुन आपला वॉर्ड कोरोनामुक्त वॉर्ड अभियानाची सुरुवात होत असुन शिवसेनेच्यावतीने या जनजागृतीमध्ये सर्व शिवसैनिक सहभागी होणार असुन कोरोनामुक्तीचा संकल्पाची सक्रीयपणे अंमलबजावणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांची सांगितले आहे. दि. 11 ते 24 मे पर्यंत होणार्‍या  या अभियानात (ता.11) रोजी सामुहिकरित्या ठिक सकाळी 11 वाजता कोरोना मुक्तीचे शपथ घेतली जाणार असुन शिवेनरी कॉलनी येथे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, ज्ञानेश्वर कॉलनी-मुकुंदवाडी येथे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, अजबनगर येथे आमदार प्रदीप जैस्वाल, क्रांतीचौक झाबंड इस्टेट येथे आमदार संजय शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित अंतर ठेवुन सामुहिकरित्या नागरीकांना शपथ दिली जाणार आहे.

त्याचप्रमाणे शहरप्रमुख बाळासाहेब थोरात मयुरनगर, विश्वनाथ स्वामी एन-8, विजय वाघचौरे कोकणवाडी, बाबासाहेब डांगे मुकुंदवाडी , महापौर नंदकुमार घोडेले विटखेडा, उपमहापौर राजेंद्र जंजाळ शिवाजीनगर, सभागृहनेता विकास जैन वेदांतनगर या वॉर्डात सामुहिक शपथ नागरिकांबरोबर घेतील. नगरसेवक त्यांच्या त्यांच्या वॉर्डात शपथ घेतील तर सर्व उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, सहगटप्रमुख, महिला आघाडी, युवासेना सर्व अंगीकृत संघटना पदाधिकारी यांनी आपआपल्या निवासी भागातील नागरिकांबरोबर शपथ घेण्याचे आवाहन करण्यात येत असुन, 12 मे जनजागृती गीत गायन, 13 मे भागातील दिपोत्सव, 14 मे रोजी कोविड योध्दायांचे अभिनंदन व छत्रपती संभाजी महाराज जयंती, 15 मे रोजी कोरोनाविरोधी पोलिस स्थापना, 16 मे स्वत:च्या सन्मान, 17 मे रोजी माझे गुरु माझे आदर्श, 18 मे रोजी समुह गान, 19 मे रोजी निबंध व चित्रकला, 20 मे रोजी रांगोळी उत्सव, 21 मे माझे आरोग्य माझ्या हाती, 22 मे रोजी मीच माझा रक्षक, 23 मे रोजी दोगज दुरी- दोन हात दुर, 24 मे रोजी आनंदोत्सव अशा उपक्रमाचे आयोजन केले असुन नागरिकांनी सर्व उपक्रमात स्वत:चे घर किंवा गच्चीवर, सुरक्षित अंतर ठेवुन चेहर्‍यावर मास्क लावुन, आपआपल्या सोयीने, आपल्या मनाने व बुध्दीने सहभागी होण्याचे आवाहन उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, जयवंत ओक, संतोष जेजुरकर, राजु राठोड, आनंद तांदुळवाडीकर, विनायक पांडे, विधानसभा संघटक राजु वैद्य, गोपाळ कुलकर्णी, सुशिल खेडकर, महिला जिल्हा संघटक सुनिता देव यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.