युवानेते अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत विविध सर्कल मध्ये अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
सिल्लोड । वार्ताहर
कोरोनामुळे बांधकाम साइट, विविध ठिकाणी सुरू असलेली कंत्राटी कामे आणि मोलमजुरीची कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. त्यामुळे हातावर पोट असणारे कामगार अडचणीत आले आहेत. सर्वत्र लॉकडॉऊन असल्यामुळे नागरिक घरामध्ये अडकून पडले आहेत. त्यांच्या मदतीसाठी तालूका शिवसेना धावून आली आहे.सिल्लोड -सोयगाव मतदार संघात ना. अब्दुल सत्तार यांच्या सौजन्याने व तालूका शिवसेनेच्या माध्यमातून 30 हजार गरजूंना अन्नधान्य, किराणा किट अशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप सुरू करण्यात आले आहे.
शनिवार ( दि.9 ) रोजी युवानेते अब्दुल समीर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील अंधारी, घाटनांद्रा या जिल्हा परिषद सर्कल मधील विविध गावांत सोशल डिस्टनसिंग चे पालन करून शिवसेनेच्या वतीने गरजूंना मदतीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, शिवसेना तालूका प्रमुख किशोर अग्रवाल, कृउबा समितीचे सभापती अर्जुन पाटील गाढे, प.स.सभापती डॉ. कल्पना जामकर, निराधार योजनेचे अध्यक्ष राजेन्द्र ठोंबरे आदींची उपस्थिती होती.
कोरोना विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी केंद्र सरकारने 18 मे पर्यंत लॉकडाउन’ तसेच राज्य सरकारने संचारबंदी लागू केली आहे. यादरम्यान कोरोनाच्या संसर्गजन्य रुग्णांच्या संख्येत घट येईल, अशी सरकारला अपेक्षा आहे. तूर्तास या संकटामुळे हातमजुरी करणार्या कुटुंबीयांसमोर दैनंदिन उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली आहे. त्यांना जीवन जगताना संघर्ष करावा लागत असल्याची ग्रामीण भागात परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता ग्रामीण भागातील गरजूंना मदत करण्यासाठी महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री ना.अब्दुल सत्तार यांनी पुढाकार घेतला असून तालूका शिवसेनेच्या वतीने सिल्लोड - सोयगाव मतदार संघातील ग्रामीण भागात 30 हजार गरजूंना अन्नधान्य, तेल, शेंगदाणे, साखर, पत्ती, डाळ , मीठ , साबण अशा प्रकारच्या जीवनावश्यक किराणा किट चे वितरण सुरू करण्यात आले आहेत.
शवसेना व राज्यमंत्री ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने सिल्लोड मध्ये लॉकडाऊनच्या पहिल्या आठवड्यापासून गरजूंना अन्नधान्य, किराणा किट ,दूध, भाजीपाला तसेच दररोज एक हजार गरजू नागरिकांना सकाळ-संध्याकाळ घरपोच जेवण देणे सुरू आहे .गेल्या दोन दिवसापूर्वी स्थलांतरित झालेले कामगार रस्त्याने पायी जात असताना या कामगारांसाठी मोफत जेवणाची व्यवस्था शिवसेनेच्यावतीने सिल्लोड येथे करण्यात आली आहे . त्यासोबतच ना.अब्दुल सत्तार यांच्या सूचनेने तालुका शिवसेनेच्यावतीने मतदारसंघातील 30 हजार गरजूंना आता अन्नधान्य तसेच किराणा किट चे वाटप करण्यात येत आहेत. एकंदरीत कोरोनाच्या संकट काळात ना. अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून मतदार संघात अविरतपणे सुरू ठेवलेला मदतीचा ओघ यामुळे गरजू नागरिकांना मोठ्या प्रमाणात आधार मिळाला आहे.
Leave a comment