महामार्गावर पडलेला माल वाहन चालकास परत सोपविला
फर्दापूर । वार्ताहर
चालत्या गाडीतून खाली पडलेला कूरकूरे चा बॉक्स वाहन चालकाचा शोध घेऊन त्याला परत करण्याची सौहार्दपुर्ण कामगिरी फर्दापूर पोलिसांनी नूकतीच केली असून पोलिसांच्या या कामगिरी मुळे गरीब वाहन चालकांची आर्थिक हानी टळल्याने त्याने फर्दापूर पोलिसांन बाबत कृतज्ञता व्यक्त केली आहे.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 24 तास कर्तव्यावर असलेल्या पोलिसांन बाबत सोशल मीडिया वर रोजच चांगल्या वाईट टिकाटिप्पण्या होतांना दिसत आहे तर काही ठिकाणी बंदोबस्ता वरील पोलिसांन वर हल्ले होण्याच्या घटना ही घडतांना दिसत आहे मात्र अश्या परीस्थितीत ही पोलिस न डगमगता सामाजिक बांधिलकी जपत आपले कर्तव्य निभावतांना दिसत आहे या बाबीचा प्रत्यय नूकताच फर्दापूर(ता.सोयगाव) येथे बघावयास मिळाला आहे दि.9 शनिवारी सकाळी आकाश बोराडे (रा.फर्दापूर ता.सोयगाव) हा युवक औरंगाबाद-जळगाव महामार्गावरून फर्दापूर पोलिस ठाण्याकडे जात असतांना त्याला महामार्गावर एक मोठा कूरकूर्याचा बॉक्स पडलेला असल्याचे दिसून आले आकाश ने तात्काळ याबाबत सा.फौ.पोपटराव कांबळे यांना अवगत केले असता सा.फौ पोपटराव कांबळे यांनी लगेच औरंगाबाद-जळगाव महामार्गावर कर्तव्य बजावत असलेल्या पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे यांना घटनेची माहिती देवून सदरील वाहन जळगाव च्या दिशेने गेल्याचे सांगितले दरम्यान पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे यांनी मोटारसायकल वरुन पाठलाग करीत औरंगाबाद-जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत या वाहन चालकास गाठून त्याचा कूरकूर्याचा माल महामार्गावर पडल्याचा व तो माल फर्दापूर पोलिस ठाण्यात सुरक्षित असल्याचे सांगितले दरम्यान सा.फौ पोपटराव कांबळे,पो.कॉ ज्ञानेश्वर सरताळे जागृत नागरिक आकाश बोराडे यांच्या हस्ते सदरील माल वाहनचालकास परत सोपविण्यात आला यावेळी आपण हा माल औरंगाबाद हून जळगाव ला घेऊन जात असल्याचे व पोलिसांच्या या सामाजिक बांधिलकी मूळे आपले आर्थिक नूकसान टळल्याचे सांगून वाहन चालकाने फर्दापूर पोलिसांन बाबत कृतज्ञता व्यक्त केली.
Leave a comment