औरंगाबाद । वार्ताहर
सध्या कोरोना विषाणुचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता घराबाहेर जाण्यास प्रतिकुल परिस्थिती आहे. प्रतिकुल परिस्थितीत घरच्या घरी राहुनच तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राच्या पुर्व दिशेला सुजलाम, सुफलाम अशा भुप्रदेशातील जीवन गौरव साहित्य परिवार भंडाराच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन कविसंमेलन संपन्न झाले. जीवन गौरवचे सहसंपादक गणेश कुंभारे, जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ चौधरी आणि संयोजक देवानंद घरत यांनी संयुक्तरित्या नियोजनपुर्वक कविसंमेलनाचे यशस्वी आयोजन केले. कविसंमेलनाला जीवन गौरव मासिकाचे मुख्य संपादक रामदास वाघमारे औरंगाबाद, उपसंपादक डी बी शिंदे पुणे, नागपूरचे साहित्यिक प्रसेनजीत गायकवाड, भंडाराहून ज्येष्ठ साहित्यिक प्रल्हाद सोनेवाने यांनी कविसंमेलनास ऑनलाईन शुभेच्छा दिल्या.
संमेलनाचे उदघाटन जीवन गौरव अहमदनगरचे सहसंपादक प्रसिद्ध कवी रज्जाक शेख यांनी गेय कवितेने करून रसिकांना रिझवले. ऑनलाईन नोंदणी झाल्यानूसार राज्याच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून 28 कविंनी कविता सादर केले. मुंबईचे मंगला उदामले, उस्मानाबादचे सहसंपादक हनमंत पडवळ, गडचिरोलीचे सहसंपादक मारोती आरेवार, संगीता ठलाल, संगीत शिक्षक राहुल सपाटे, चंद्रपूरचे सहसंपादक दुशांत निमकर, किशोर चलाख, भावना खोब्रागडे, विशाल गेडाम, यवतमाळचे कल्याणी मादेशवार, प्रमोदिनी किनाके, भंडाराचे धनंजय मुळे, वामन गुर्वे, विशाल बोरकर, राम वाडीभस्मे, अचल दामले, पल्लवी शेंडे, हिंगोलीचे महादेव ढोणे, वर्धेचे निकीता वाघमारे, उदय दमाये, धुळेचे रविंद्र चौधरी, साताराचे शर्मिष्ठा पोल, गोंदियाचे कुमारचंद जनबंधु, नागपूरचे उषा पवार, कोल्हापूरचे माधुरी पंडीत यानी विविध विषयावर मुक्तपणे कविता सादरीकरण केले. काही साहित्यात रमलेले तर काही नवोदीत कवींचा सहभाग हा सर्वांसाठी आनंददायी ठरल्याचे प्रतिक्रीया सर्वांकडूनच मिळाल्या. आम्ही नवोदीत आहोत, आम्हाला संधी दिल्यास नक्कीच संधीचे सोने करू, अशा बोलक्या प्रतिक्रिया देऊन जीवन गौरव साहित्य परिवाराची जबाबदारी वाढवून दिली. तंत्रस्नेही शिक्षक म्हणून जिल्ह्यात ज्यांची ख्याती आहे असे देवानंद घरत सरांनी आपली भुमिका प्रभावीपणे पार पाडली. कविसंमेलनाचे सुत्रसंचालनाची जबाबदारी तीनही संयोजक शिक्षकांनी सांभाळली.
Leave a comment