चार आरोपी ना अटक स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही 

जालना । वार्ताहर

स्थानिक गुन्हे शाखेने 15 लाख 18 हजार रुपयांचा गुटख्यासह मुद्देमाल जप्त करण्यात आला असून  4 आरोपी ना आज सकाळी अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना गुप्त माहीती  मिळाली की  एक इसम जाफ्राबाद रोडवरील आपल्या  शेत वाडयावरील घरात व घराच्या परीसरातील जागे मध्ये महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला गुटखा व सुगंधी तंबाखू पदार्थाचा साठा करुन त्याची चोरटी विक्री करीत आहे अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर हे त्यांचे स्टाफ सह तात्काळ सकाळीच 6 वा मिळालेल्या बातमीच्या ठिकाणी जावुन अचानक छापा टाकला . त्याठिकाणी 4 इसम हे मालाची वाहनातन चढउतार कारत असतांना मिळुन आले त्यांना ताब्यात घेवन त्यांचे नावे गावे व इतर अधिक माहीती विचारली . त्यांनी त्यांचे नाव अन्ना गजानन जगताप वय 21 वर्ष रा.राजूर ता . भोकरदन जि . जालना,अक्षय पुंडलिक मगरे वय 18 वर्ष रा . राजुर ता . भोकरदन जि . जालना,मोहमंद तन्वीर अब्दुल खालेद मोमीन वय 21 वर्ष रा . बद्रुदीन हॉस्पीटल जवळ जालना,अहमद रझा अशपाक शेख वय 22 वर्ष रा . रा . बद्रुदीन हॉस्पीटल जवळ जालना अशी सांगितली.

सदरचा शेत वाडा व गुटख्याचा माल हा संदिप दत्तात्रय भुमकर रा . राजुर याचाच असल्याचे त्यांनी सांगितले. सदर शेतवाडया मधुन व वाहनातुन एकुण 9 लाख 18 हजार रुपये किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला गोवा व राजनिवास गुटखा मिळुन आला . तसंच गुटख्याची वाहतूक करण्यासाठी एक महिंद्रा कंपनीचे बोलेरो पिक अप वाहन व दोन मोटर सायकल असा एकण 15 लाख 18 हजार रुपायचा मुददेमाल जप्त करुन अन्न औषध प्रशासन विभाग जालना येथील अधिकारी यांना पाचारण करुन त्यांचे मार्फतीने पुढील कार्यवाही करण्यात आले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एस चैतन्य यांनी दिली. सदरची कार्यवाही  ही पोलीस अधिक्षक  एस.चैतन्य, अपर पोलीस अधिक्षक समाधान पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजद्रसिंह गौर, पोलीस उपनिरीक्षक दाशा राजपत, संम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, सचिन चौधरी, हिरामण फलटणकर यांनी केलेली आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.