अनेक ठिकाणी वादळी वार्यासह गारांचा पाऊस फळ पिकांचे अतोनात नुकसान
तीर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात आज दिवसभर उन्हाचा पारा वाढल्यामुळे अंगाची लाही लाही व घामाच्या धारा निघत असताना ढगाळ वातावरण आकाशात विजा चा कडकडाटासह वादळी वार्यासह जोरदार पावसाला सुरुवात होऊन तालुक्यातील राजेगाव व सागर सहकारी साखर कारखाना घनसावंगी तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर अनेक ठिकाणी वादळी वार्यासह पावस देव हिवरा तालुक्यात सायंकाळी पाच ते सहा दरम्यान जोरदार गारपीट होऊन फळ पिकात मोसंबी केळी आदीसह डाळिंब पिकाची गारपिटीमुळे प्रचंड नुकसान झाले असून राजेगाव येथे लिंबाच्या आकाराच्या गारा अर्धातास पडल्या तर मते हिवरा येथे बोरा सारख्या आकाराच्या पंधरा ते वीस मिनिट गारा पडल्याने जमिनीवर गारांचा थर दिसून आला.
या अवकाळी पावसाच्य कहर शेतकर्यांच्या मुळाशी आल्यामुळे शेतकर्यांची लाखो रुपयांचे नुकसान झाले असून तीर्थपुरी परिसरातही अवकाळी पाऊस व वादळी वार्यामुळे शेतात राहणार्या लोकात एकच पळापळ धांदल उडाली अनेकांची घरावरील रस्त्यावरील पत्रे उडाली अनेकांची कांदे अवकाळी पावसामुळे भिजले हा अवकाळी वादळी वारे उशिरापर्यंत तीर्थपुरी परिसरात सुरू होते तसेच लाईट बत्ती गुल झाली असल्यामुळे लोकात अंधारात रात्र काढावी लागत असल्याने उकाडा मोठ्या प्रमाणात होता.
Leave a comment