मंठा । वार्ताहर
कोरणा प्रादुर्भाव काळात अनेक लोक वाहतुकीची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्यामुळे पायी चालून आपापल्या गावी परत येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यातच काही लोक रेल्वे मार्गाने पायी चालत येत आहेत त्यातच रेल्वे रुळावर मालगाडी खाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झालेल्या स्थलांतरितांच्या कुटुंबीयांना केंद्र सरकार व राज्य सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केली दोन मे 2020 रोजी महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना पत्रव्यवहार करून स्थलांतरित मजुरांचे प्रचंड हाल होत असल्याची बाब निदर्शनास आणून दिली होती ग्रामीण भागातून पोटाची खळगी भरण्यासाठी स्थलांतरित झालेले हे सर्व मजूर पायी प्रवास करत आहेत ही बाब देखील निदर्शनास आणून दिली होती यांच्या तात्काळ तपासण्या करून त्यांना घरी जाण्यासाठी मोङ्गत बस व्यवस्था करून देण्यात यावी अशी मागणी देखील पत्राद्वारे मुख्यमंत्री महोदयांना केली होती परंतु त्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही आणि रेल्वे रुळावर या स्थलांतरित लोकांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी कानावर आली ही बातमी मन सुन्न करून टाकणारी असून प्रचंड दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिली.
2 मे रोजी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून लोणीकर यांनी मोङ्गत बसची मागणी केली होती या मागणीवर विचार झाला असता तर निश्चितपणे हा प्रकार टाळता आला असता अशी चर्चा जनसामान्यांमध्ये आहे पोटाची खळगी भरण्यासाठी गेलेल्या या नागरिकांना दुर्दैवी मृत्यू चा सामना करावा लागत असला तरी हे त्यांच्या कुटुंबातील कुटुंबप्रमुख होते कुटुंबप्रमुख गेल्याने या कुटुंबावर प्रचंड मोठा आघात झाला असून त्यांच्या कुटुंबीयांना राज्य सरकार व केंद्र सरकारने प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत करावी अशी मागणी देखील लोणीकर यांनी यावेळी केली बस सुविधांबरोबरच रेल्वे ची सुविधा देखील करण्यात यावे यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना देखील पत्रव्यवहार करण्यात आला असून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र बाहेरील स्थलांतरितांना त्यांच्या राज्यात पाठविण्याबाबत रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असून त्याबाबतचे काम सुरू झाले आहे ज्याप्रमाणे परराज्यात जाणार्या स्थलांतर यांची रेल्वे मार्ङ्गत व्यवस्था करण्यात आली अगदी त्याच पद्धतीने मुंबई ते नांदेड रेल्वे व्यवस्था करण्यात आल्या मराठवाड्यातील अनेक लोकांना आपापल्या घरी सुरक्षितरित्या जाता येण्यास मदत होणार आहे अशी मागणीदेखील लोणीकर यांनी पत्राद्वारे केंद्रीय रेल्वे मंत्री यांना केली आहे राज्य सरकारने देखील याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करावा लवकरात लवकर या स्थलांतरितांची गावाकडे येण्याची सोय होईल यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी केली परतूर विधानसभा मतदारसंघातून 2558 लोकांची यादी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पीठासीन अधिकारी विधिमंडळ महाराष्ट्र राज्य आणि जिल्हाधिकारी जालना यांना पाठवली असून त्याबाबत अद्याप पर्यंत कोणताही निर्णय शासनाने घेतलेला नाही याव्यतिरिक्त परतूर मतदार संघाच्या बाहेरील आणि जालना जिल्ह्यातील साधारणतः 6000 पेक्षा अधिक स्थलांतरित लोक मुंबई-पुणे-नाशिक सारख्या ठिकाणी अडकून पडलेले आहेत या सर्व नागरिकांना सुरक्षित रित्या त्यांच्या घरी पाठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची असून राज्य सरकार मात्र वेळ काढू भूमिका घेत आहे राज्य सरकार कडून केवळ विरोधी पक्षातील आमदारांनी मोङ्गत बस ची मागणी केली म्हणून दुर्लक्ष करण्यात आले असेल तर ही अत्यंत दुर्दैवी बाब असून या गंभीर प्रकारानंतर तरी सरकारला जाग येईल आणि लवकरात लवकर स्थलांतरित नागरिकांना आपल्या गावी जाण्यासाठी राज्य सरकार बस किंवा रेल्वेची सेवा उपलब्ध करून देईल अशी अपेक्षा देखील यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केली.
Leave a comment