जिल्हाधिकार्यांनी लक्ष घालण्याची गरज
भोकरदन । वार्ताहर
मालेगाव येथून सरळ भोकरदन येथील शासकीय निवासी शाळेतील कोविड केअर सेन्टर मध्ये तब्बल 64 जवान व अधिकार्यांना शुक्रवारी 8 रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु सेन्टर मध्ये दाखल होताच या जवानांनी आपल्या मनमानी ला सुरवात करत आपापल्या रूम मध्ये थांबण्या ऐवजी कोविड सेंटरच्या आवारात तर काहीजण बाहेर ङ्गिरू लागले. वास्तविक त्यांनी तात्काळ आपापल्या रूम मध्ये थांबणे गरजेचे होते. यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचार्यात घबराट निर्माण झाली. वास्तविक त्यांचे अधिकारी रूममध्ये जाण्यासाठी सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचे दिसून आले. दरम्यान, या जवानांच्या मनमानीमुळे या गरीब कर्मचार्यांना आपल्याला कोरोनाचे संक्रमण होणार तर नाही ना या भीतीने ग्रासले असून जिल्हाधिकार्यांनी तात्काळ या कर्मचार्यांची अडचण समजून घ्यावी व त्यांना सर्व साहित्य पुरविण्याची गरज निर्माण झाली आहे. भोकरदन येथे समाजकल्याण विभागामार्ङ्गत निवासी शाळा, मुला व मुलींचे वसतिगृह चालविले जाते. याठिकाणी बी. व्ही. जी. या खाजगी कंपनी मार्ङ्गत बाह्यश्रोत कर्मचार्यां मार्ङ्गत तुटपुंज्या पगारावर काम करून घेतले जाते. सध्या देशात व राज्यात कोरोना ने कहर केला असून विलगीकरण कक्ष साठी म्हणून शासनाने निवासी शाळा व वसतिगृह ताब्यात घेतले आहे.
आठ दिवसापूर्वी मुलांच्या वसतिगृहात जवळपास 23 जणांना कौरंटाइन केलेले आहे परंतु हे सर्व जण अत्यंत गरीब असून ते सर्व आपापल्या रूम मध्ये राहतात त्यामुळे कोणालाही याचा त्रास अथवा भीती वाटली नाही परंतु कालपासून आलेले राज्य राखीव दलाचे जवान हे अत्यंत मनमानी पणे वागत आहेत. दारु पिऊन धिंगाणा घालणे, उघडेच बाहेर ङ्गिरणे, आपापल्या रूम मध्ये न थांबणे आदी प्रकार करीत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत कर्मचारी हबकून गेल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे त्यांच्या अधिकार्यांचे ही हे कर्मचारी ऐकत नसल्याचे समजते. या गंभीर बाबींची दखल जिल्हाधिकारी व राज्य राखीव दलांच्या अधिकार्यांनी घेणे आवश्यक आहे व केवळ जवानांच्या मनमानी व बेङ्गिकीर पणा मुळे कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोना संक्रमणा पासून वाचविणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे.
Leave a comment