पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
कोरोणाच्या पाश्वभूमीवर मागील 45 दिवसांपासून देशात लॉकडाऊन लागू आहे.त्यामुळे सर्वजण घरातच बसून आहे. यातच सध्या उन्हाचा पारा देखील कमालीचा वाढला आहे. यामुळे वाढत्या तापमानाने अंगाची लाहीलाही होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत .लॉकडावुन कालावधीत बाहेर ङ्गिरताना आढळल्यास प्रशासनाकडून कारवाई होत आहे. त्यामुळे नागरिक शक्यतो बाहेर ङ्गिरणे टाळुन घरात राहणे पसंत करीत आहे. मात्र आता मे महिन्याची सुरुवात होताच पारा वाढु लागला आहे 8 मे रोजी तालुका व परिसरातील तापमान 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. त्यामुळे नागरिक घामाघूम होत आहे. सकाळपासून उन्हाचा पारा वाढत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे त्यातच घरातील ङ्गॅन. कुलर .यामध्ये बिघाड झालेला आहे ते दुरुस्ती करण्यासाठी इलेक्ट्रिकल्स दुकाने बंद असल्याने ग्रामस्थांची पंचायत झाली आहे. त्यासाठी इलेक्ट्रिकल दुकाने चालू करण्यात यावी अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरत आहे.
इलेक्ट्रॉनिक दुकाने बंद असल्याने दुरुस्ती करावी कोणाकडे यामुळे नागरिकांची घालमेल होत आहे. त्यामुळे घरातील ङ्गॅन कूलर बंद अवस्थेत पडून आहेत यावर नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस सद्या दिवसभर पहारा देत असुन त्यांना देखील या उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे काही आजार डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी नागरिकांनी काळजी घेण्याचे आव्हान प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव रेणुकाई येथील वैद्यकीय अधिकारी डॉ आर्.एम. रावुत यांनी केले आहे विशेषतः जास्त पाणी पिणे. सेल व सुती कपडे वापरणे ,असे आवाहन त्यांनी केले तसेच घराची दारे-खिडक्या खुल्या ठेवाव्या व उन्हात बाहेर ङ्गिरु नये असे सुद्धा त्यांनी सांगितले.
Leave a comment