जालना । वार्ताहर
जिल्ह्यात राजस्थान, कर्नाटक व तामिळनाडु या राज्यातील ज्या नागरीकांना संबंधित राज्यात जायचे आहे अशा नागरीकांनी राजस्थान, कर्नाटक व तामिळनाडु या राज्याने तयार केलेल्या लिंकवर माहिती भरावी. राजस्थानमध्ये जाणा-या नागरीकांनी राजस्थान शासनाच्याeMitra Portal यावर किंवा +181/18001806127 या नंबरवर नोंदणी करावी. कर्नाटक राज्यात जाणा-या नागरिकांनी Seva Sindhu Portal यावर नोंदणी करावी. तामिळनाडु राज्यात जाणा-या नागरीकांनी tnepass.tnega,org
बिहार या राज्यातील कामगारांना बिहारमधील पटना या ठिकाणी पाठविण्यासाठी जालना येथुन विशेष रेल्वे सोडण्याचेनियोजीत आहे. यासाठी या सर्व नागरीकांची यादी व प्रत्येकी 690 रुपये रेल्वे भाडे जमा करुन त्याची यादी या कार्यालयासपाठवावी. यादी व पैसे या कार्यालयास प्राप्त झाल्यानंतर संबंधिताच्या तिकिटाची व्यवस्था करावी. नागरीकांना आवाहन आवाहन करण्यात येते की, त्यांनी आपल्या संबंधित तहसिल कार्यालयास संपर्क साधावा. संबंधितांना ज्या दिवशी विशेष रेल्वे सोडण्यात येईल त्या दिवशी संबंधित नागरिकांना जालना रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था करावी, अशा सुचना जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना निर्गमित करण्यात आल्या आहेत. मनोज देशमुख प्रकल्प संचालकराष्ट्रीय बाल कामगार प्रकल्प, जालना हे प्राप्त याद्यानुसार रेल्वे विभागाशी समन्वय साधुन तिकिटाची व्यवस्था करतील तरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगांवकर जि.प. जालना हे सर्व नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्र व मास्क देण्याचे नियोजन करतील असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. 1200 प्रवाशांची संख्या झाल्यानंतर पहिली विशेष रेल्वे बिहारला सोडण्यात येईल.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिक्षकांची आढावा बैठक संपन्न झाली . यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोव्हीड केअर सेंटरच्या तयारीचा आढावा घेऊन ज्या रुग्णांना कोरोना विषयक लक्षणे नाहीत अशांना तालुका स्तरावर सर्व उपचार करण्यात यावे. तालुका स्तरावर सर्व खाजगी दवाखाने सुरु ठेवण्याच्या सुचनाही श्री. बिनवडे यांनी दिल्या. बाहेर राज्यातुन किंवा राज्याच्या इतर जिल्ह्यातुन कोरोना संबंधित एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याचा स्वॅब तपासणीसाठी RT-PCR ॲप्लीकेशनचे प्रशिक्षण वैद्यकीय अधिक्षकांना देण्यात आले. बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी , डॉ. विवेक खतगावकर, डॉ. संजय जगताप,डॉ. संतोष कडले, डॉ. ए.बी. जगताप हे उपस्थित होते.
आरोग्य सेतु या ॲपवर कोव्हीड-19 या विषयी ज्या काही सुविधा आहेत त्या सुविधांचा जिल्ह्यातील ज्या नागरीकांकडे स्मार्ट फोन नाहीत अशा नागरीकांना 1921 या टोल फ्री क्रमांक डायल करुन लाभ घेता येईल. यात नागरीकास IVRS SYSTEM द्वारे वर फोन येईल यावर विचारलेली माहिती नागरीकांनी व्यवस्थितरीत्या द्यावी. या सुविधेचा जिल्ह्यातील नागरीकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडुन करण्यता आले आहे.
जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी आजपर्यंत उत्तरप्रदेश – 3688, बिहार-2325, मध्यप्रदेश-788, राजस्थान-658, पश्चिम बंगाल- 392, यासह उर्वरीत बारा राज्यातील एकुण -9018 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 2058 अशा एकुण 11076 नागरीकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात एकुण 1293 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 28 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 793 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या- 18 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1137 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या -08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1107, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 239, एकुण प्रलंबित नमुने-18 तर एकुण 765 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या-19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 554 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या -94, सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती -218, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित- 06, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -28, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -13, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 260 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.
कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 218 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना – 02, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-14, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना -24, मॉडेल स्कुल अंबा रोड परतुर-27, जिजाऊ इंग्लिश स्कुल जाफ्राबाद- 15, हिंदुस्थान मंगल कार्यालय, जाफ्राबाद – 06, डॉ.बाबासाहेब हॉस्टेल भोकरदन-23 डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्रं 1-64, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल अंबड – 06, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल घनसावंगी -09 येथे अलगीकरण करण्यात आले आहे.
लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 498 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 80 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 540 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम 26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 74 हजार असा एकुण 3 लाख 808 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Leave a comment