तिडका ते औरंगाबाद बससेवा
सोयगाव । मनिषा पाटील
लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मध्यप्रदेशातील(बैतुल)19 मजुरांना मायदेशी परतण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मदतीने.सोयगाव-बनोटी रस्त्यावरून तिडका मार्गे सोयगाव आगाराची पहिली बस औरंगाबादच्या दिशेने दुपारी झेपावली आहे.
या बसला तहसीलदार प्रवीण पांडे,सोयगाव बस आगारप्रमुख हिरालाल ठाकरे,राष्ट्रवादीचे जेष्ठ्नेते राजेंद्र अहिरे,शहरध्यक्ष रविंद्र काळे,राजेंद्र दुतोंडे,चंद्रकांत काळे,डॉ.दिनकर पिंगाळकर आदींनी हिरवा झेंडा दाखवून बस सोयगाववरून तिडका गावाकडे रवाना केली. मध्यप्रदेशातून सोयगाव तालुक्यातील तिडका येथे पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले 19 कुटुंब लॉकडाऊनमध्ये 45 दिवसापासून अडकली होती.त्यांच्या हातांना कामे नसल्याने उपासमार होत असल्याने त्यांना मध्यप्रदेशात परतीचा प्रवास करावयाच होता.परंतु कोरोना संसर्गाच्या तिसर्या लॉकडाऊन दरम्यान शासनाने परराज्यातील अडकलेल्या मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठविण्याचा अध्यादेश काढून त्यासाठी नियमावली बनविली होती.या नियमावलीत सक्षम अधिकार्याचे प्रमाणपत्र आणि वैद्यकीय प्रमाणपत्रासह नोंदणी करणे आवश्यक होते,त्यानुसार तिडका येथील मजुरांनी ग्रामस्थांच्या मदतीने ऑनलाईन नोंदणी करून सोयगावचे तहसीलदार प्रवीण पांडे यांनी या मजुरांची नोंदणी तातडीने पडताळणीसाठी जिल्हाधिकारी यांचेकडे पाठवून जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी तातडीने या मजुरांची सदोष यादी तहसील कार्यालयाला सादर केली यामध्ये औरंगाबादवरून शुक्रवारी रात्री अकरा वाजता या मजुरांना रेल्वेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.त्या अनुषंगाने तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या मजुरांना तिडका ते औरंगाबाद या मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती.या प्रवासाच्या देयकाचा भार राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते रंगनाथ नाना काळे यांनी स्वीकारून सोयगाव बस आगारातून या मजुरांना बस उपलब्ध करून देण्यात आली होती.
Leave a comment