औरंगाबाद । वार्ताहर
जैन अलर्ट ग्रुप आँफ इंडियाच्या औरंगाबाद शाखेच्या वतीने मागील तीन दिवसापासुन एक अतिशय आगलावेगला उपक्रमाच्या माध्यमातुन मानवसेवा केली जात आहे. लाँकडाऊन वाढल्यामुले आणी छोट्या मोठ्या कंपन्याचे कामकाज ठप्प झालेत सोबतच वाहतुक बंद असल्याने महाराष्ट्रातील विभीन्न भागा सोबतच परप्रांतीय कामगारांना शेकडो किलोमीटर भर उन्हात सहपरिवार सह वतीने करीत आहेत.
दररोज शेकडो नागरीक शहरातुन पायी प्रवास व त्यांची कठीन परिस्थिती बघता जैन अलर्टग्रुप औरंगाबादच्या वतीने यांच्या दुखाचा काही भार कमी करण्याचा प्रयत्न केला गेला या पायी जाणार्या नागरीकांची सेकडो किलोमीटर पायी चालल्याने पादत्रानाची पार चाळणी झाली काही तर बिना पादत्रानाने प्रवास करीत आहेत अशा सर्व नागरीकांना चप्पल, टोपी, मास्क व रत्यात ओषधी किंवा अत्यावश्यक सामान घेण्यासाठी शंभर रुपये रोख सोबतच काही खाद्यप्रदार्थ देण्याचा उपक्रम तीन दिवसापासुन दररोज सकाली 6 से 8 वाजेपर्यत राबविला जातोय बीड बायपास, जालना रोड, जलगांव रोडवर स्वतः कार्यकर्त पोहचुन ही मानवसेवा करीत आहे. यासाठी समाजातील दानदात्याचे ही सहकार्य लाभले आहे. हा उपक्रम राबविण्यासाठी अजित चंडालिया, निलेश जैन, मुकेश परिहार, आशीष जैन, प्रकाश कोचेटा सोबतच जैन अलर्ट ग्रुपचे सदस्य परिश्रम घेत आहे अशी माहिती प्रचार प्रसार संयोजक नरेंद्र अजमेरा, पियुष कासलीवाल यांनी दिली.
Leave a comment