तहसील कार्यालय व पाचोड पोलीसांची कामगिरी
पाचोड । वार्ताहर
कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर भारत सरकारने 22 मार्च रोजी पासून लाँकडाऊन जाहीर केला तो लॉकडाऊन वाढत चालल्याने मजूरांच्या हाताला काम नाही पोटाला नाही पोटाला अन्न नाही यामुळे आपल्या लहान मोठ्या लेकरांना घेऊन गावाकडे जाण्याची आस लागल्याने अनेक परप्रांतीय मजूर हे पायीच पायपीट करत गावाकडं निघाले असून यामुळे अनेक ठिकाणी या मुजरा सोबत अपघात होत आहे पार्श्वभूमीवर पाचोड येथील मजुरांना पैठण तहसीलदार व पाचोड पोलीस यांच्या प्रयत्नाने खाजगी वाहनाने आज रोजी गावाकडे यांना रवाना करण्यात आले.
मध्य प्रदेश राज्यातील परभणी येथील (22) व पाचोड मोसंबी मार्केट कामासाठी आलेल्या दोनशे मजुरांना पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके व पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या पुढाकारातून खाजगी वाहनातून त्यांच्या गावी रवाना करण्यात आले. परभणी येथे मजुरी करणार्या मजुरांनी औरंगाबाद सोलापूर महामार्गावरील मुरमा ता. पैठण चेकपोस्ट वरून मध्यप्रदेशकडे पायी निघालेल्या(22)मजुरांना पाचोड पोलिसांनी थांबून त्यांना पाचोड (ता.पैठण) येथील जवाहर विद्यालयमध्ये काँरटांईन करण्यात आले होते व राहण्याची जेवणाची व्यवस्था करण्यात होती तसेच पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजूनाना भुमरे व पाचोड पोलिसांनी त्यांना खाण्यापिण्याची सोय व रेशन उपलब्ध करून दिले होते, मध्यप्रदेश मधील खंडवा या जिल्ह्यातील मजुरांना तहसील प्रशासनाच्या वतीने गावी आपल्या राज्यात जाण्याकरिता पासेस उपलब्ध करून देण्यात आल्यानंतर ग्रामीण रुग्णालय पाचोड येथे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येऊन प्रशासनाला याबाबत अहवाल देऊन आज दिनांक आठ शुक्रवारी आपल्या गावी खाजगी वाहनाने रवाना करण्यात आले यावेळी पैठणचे तहसीलदार चंद्रकांत शेळके पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल येरमे, उपनिरीक्षक युवराज शिंदे, पो.काँ भगवान धांडे, नुसरत शेख पाचोडचे तलाठी चंदेल ठाकूर, रमेश शेळके यांच्यासह पत्रकार हबीब पठाण, शिवाजी पाचोडे, इरफान शेख, विजय चिडे, सिराज सय्यद, मुनवर सय्यद आदी हजर होते, मजुरांंनी सर्व व गावकरी प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
Leave a comment