खूलताबाद । वार्ताहर

सर्वत्र लॉकडाऊन नाकाबंदी असल्याने एक व्यक्ति मुंबईहुन खुलताबादला पायी चालत खुलताबादला आला असता त्याची तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याने खुलताबाद शहर व परिसरात राहीवाशी भयभीत झाले आहेत. त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीचा नगरपरिषद व आरोग्य विभागाचे कर्मचारी शोध घेत आहे. लॉकडाऊनचे दोन टप्पे संपले आतापर्यंत खुलताबाद शहर व परिसरात एकही रुग्ण आढळून आला नव्हता. परंतु तिसर्‍या टप्प्यात एक पॉझिटिव्ह व्यक्ती सापडला सदर व्यक्ति हा मुंबईहुन वय (30) वर्ष दोन दिवसांपुर्वी पायी खुलताबाद शहरात आला असता जागोजागी असलेल्या चेकपोस्टवर त्याचा शहरात प्रवेश नाकारण्यात आला. 

सदर व्यक्तीने भावास बोलावले असता भावाने त्याला खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता सदर व्यक्तीला नंद्राबाद येथील पेस सेंटर येथे विलगिकरण करण्यात आले. सदरील युवकाच्या स्वब तपासणीचा रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आल्याने नगर परिषदेने तातडीने दखल घेत, नगर परिषद कर्मचारी अंकुश भराड पाटील व शहजाद बेग यांनी राजीव गांधीनगर येथील सदर व्यक्तीच्या भावाची भेट घेऊन संपर्कात आलेल्यांची माहिती संकलित केली. सदर रुग्णाचे सुलिभंजन परिसरात घर असून, तो सध्या राजीव गांधी नगर जवळ बायको, मुलांसोबत भाड्याच्या घरात राहत होता, या व्यक्तीचा घरातील सदस्या व्यतिरिक्त बाहेर कुणाशीही संपर्क  आला नसल्याचे येथील कर्मचार्‍यांनी सांगितले व नागरिकांनी घाबरून जाऊ नका मात्र काळजी व दक्षता घेऊन स्वच्छता राखा असे आवाहन मुख्य धिकारी ज्योती भगत पाटील व नगर अध्यक्ष एडवोकेट एस एम कमर यांनी केले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.