शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांनी व्यक्त केला संताप
उपाययोजनेसाठी सरकारला धारेवर धरू आमदार लोणीकर यांचे आश्वासन
जालना । वार्ताहर
कोरोना प्रादुर्भाव काळात शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणा प्रचंड सतर्क असणे आवश्यक असून कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वोत्तम उपाय योजना करणे आवश्यक आहे अशी परिस्थिती असताना शहरी आणि ग्रामीण भागात देखील शासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असून शहरी व ग्रामीण भागातील नागरिकांनी माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे खंत व्यक्त केली. मंठा शहर आणि मंठा ग्रामीण मधील नागरिकांशी आमदार बबनराव लोणीकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला प्रसंगी नागरिकांनी ही खंत व्यक्त केली कोरोना पार्श्वभूमीवर लोणीकर यांनी सर्कल निहाय बैठका घेतल्या असून मंठा शहरासह खोराड सावंगी जिल्हा परिषद सर्कल च्या बैठकीत प्रसंग नागरिकांनी आपली खंत आणि संताप व्यक्त केला यावेळी प्रशासनाला आपण या सर्वव्य दर्शनासाठी आणून देऊ आवश्यकता भासल्यास प्रशासनासह सरकारला धारेवर धरू अशा आश्वासन आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी दिले.
प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणारा मोफत तांदूळ असेल किंवा नियमित शिधापत्रिका द्वारे केले जाणारे धान्य वाटप झाले आहे किंवा नाही संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना राज्य सरकार सह केंद्र सरकारकडून देण्यात येणारे एक हजार रुपयाचे अनुदान मिळाले आहे किंवा नाही बाहेरगावाहून आलेल्या स्थलांतरित बांधवांच्या आरोग्य तपासण्या केल्या आहेत काय गावागावातील वार्डातील तील स्वच्छता त्याच प्रमाणे फवारणी करण्यात आले आहे का इत्यादी बाबींवर लोणीकर यांनी यावेळी व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे नागरिकांशी चर्चा केली. मंठा चे माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे यांनी मोफत रुग्णवाहिका सुरू केल्याबद्दल लोणीकर यांनी त्यांचे अभिनंदन केले प्रसंगी बोराडे यांनी बाहेरगावाहून आलेल्या लोकांची तपासणे व्यवस्थित केली जात नसल्याबाबत तक्रार आमदार लोणीकर यांच्याकडे केली प्रशासन कोरोना पार्श्वभूमीवर फारसे गंभीर नसून रेशन मार्फत दिले जाणारे धान्य देखील आणि तर आणि नियमाप्रमाणे वाटप केले जात नाही अशी तक्रार इसामुद्दीन पटेल यांनी यावेळी केली तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात बांधकाम मजुरांना प्रत्येकी पाच हजार रुपये मानधन देण्यात आले होते त्याचबरोबर त्यांना विविध योजना त्यांच्यासाठी राबवण्यात आल्या होत्या परंतु विद्यमान सरकारने मात्र बांधकाम कामगारांना किंवा दोन हजार रुपयांवर बोळवण केली असून त्यातीलही अनेक मजुरांना अद्याप पर्यंत पैसे मिळाले नाहीत अशी तक्रार देखील यावेळी राजेश मोरे मुस्तफा पठाण व शेख रहीम यांनी लोणीकर यांच्या समोर मांडली.
मंठा शहरामध्ये सोशल डिस्टन्स चा पार बोजवारा उडाला असून अनेक बँकांचे समोर संजय गांधी निराधार योजना किंवा पी एम किसान किंवा इतर मोदीजींनी जनधन खात्यावर दिलेल्या पाचशे रुपये साठी रांगा लागल्या असून नागरिक फारशी गांभीर्याने घेताना दिसत नाहीत असे चित्र आहे यामध्ये साठ वर्षाच्या पुढील अनेक लोक समाविष्ट असून बँकेसमोर जमा होणारे गर्दी प्रचंड धोकादायक ठरू शकते यासाठी पोलिस प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून परतूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आपण पोलीस प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात अशी मागणी बाजीराव बोराडे लक्ष्मण बोराडे नारायण दवणे खंडू लहाने यांनी यावेळी केली पोलीस प्रशासन त्यांच्याशी बोलतो आपण सर्वांनी देखील पोलीस प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे यावेळी लोणीकर यांनी स्पष्ट केले. पी एम किसान योजनेअंतर्गत अर्ध्या अधिक लोकांना योजनेचे पैसे मिळाले नसल्याबाबत ची तक्रार देखील अनेक शेतकर्यांनी यावेळी आमदार लोणीकर यांच्यासमोर मांडली शहरी भागात वर्ड मध्ये वारंवार फवारणी होणे अपेक्षित असताना देखील फवारणी करण्यात येत नसल्याची तक्रार देखील यावेळी नागरिकांनी आमदार लोणीकर यांच्या समोर मांडली. ग्रामीण भागातून शेतकर्यांनी आपला कापूस सीसीआय मार्फत विक्री करण्यासाठी जिनिंग प्रेसिंग याठिकाणी आणला असून दररोज केवळ 25 ते 30 गाड्यांची खरेदी केली जाते व उर्वरित लोकांना मात्र अनेक दिवस वाट पाहायला लागण्याची शक्यता असून पाच हजारांपेक्षा अधिक शेतकर्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती दक्षता समितीचे अध्यक्ष अशोक वायाळ यांनी यावेळी लोणीकर यांना दिली लवकरच पेरणीला सुरुवात होत असून तत्पूर्वी खाताचा कृत्रिम तुटवडा देखील जाणवण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती अशोका यांनी यावेळी दिली.
पीएम कसा योजनांमध्ये अनेक शेतकर्यांची अडवणूक केली जात असून तहसील कार्यालयामध्ये पी एम किसान मध्ये यादीत झालेल्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी ऑपरेटर देखील नसल्याची बाब सुभाषराव राठोड आणि राधाकिसन बोराडे यांनी आमदार बबनराव लोणीकर यांच्या निदर्शनास आणून आणुन दिली खाजगी जमीन मध्ये शेतकर्यांची अडवणूक केली जात असून कमी भावाने कापसाची खरेदी केली जात असल्याची तक्रार देखील राधाकिसन बोराडे यांनी यावेळी लोणीकर यांच्याकडे केली. खोराड सावंगी येथील आरोग्य विभागाचे उपकेंद्र असून आपल्यासारखेच असल्याची खंत जिल्हा परिषद सदस्य शिवदास हानवते यांनी यावेळी व्यक्त केली बाहेर गावाहून स्थलांतरित लोक आता गावाकडे परत येत असून या लोकांची ची तालुक्याच्या ठिकाणी तपासणी व्हावी परंतु गावात उपकेंद्र असल्यामुळे गावात देखील त्यांची तपासणी करून त्यांना गावामध्ये प्रवेश दिला जावा शी गावकर्यांची इच्छा आहे परंतु उपकेंद्रात तपासणीसाठी एकही अधिकारी कर्मचारी नसल्यामुळे रात्री-बेरात्री बाहेरून आलेले लोक वीणा तपासणे गावामध्ये प्रवेश करत आहेत अशी माहिती येथील ग्रामस्थ सचिन राठोड यांनी यावेळी आमदार लोणीकर यांना दिली. खोराड सावंगी जिल्हा परिषद सर्कल मधील अनेक गावांना टँकरची व्यवस्था करणे आवश्यक असल्याबाबतची माहिती देखील यावेळी शिवदास हनवते यांनी लोणीकर यांना दिली प्रसंगी ज्या गावांमध्ये पाण्याची अडचण असेल त्या ग्रामपंचायतीने तात्काळ प्रस्ताव गटविकास अधिकार्यांकडे पाठवावा आपण स्वतः त्यासाठी पाठपुरावा करु असे शब्द यावेळी बबनराव लोणीकर यांनी उपस्थितांना दिला. या व्हिडिओ कॉन्फरन्स साठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल लोणीकर माजी नगराध्यक्ष कैलास बोराडे उपसभापती राजेश मोरे नगरसेवक सचिन बोराडे वैजनाथ बोराडे मुस्तफा पठाण नारायण दवणे इस्लाम पटेल अविनाश राठोड राधाकिसन बोराडे अशोक वायाळ यशवंत कुलकर्णी सुभाष राठोड माऊली वायाळ प्रसादराव गडदे तानाजी शेंडगे किशोर हनवते शिवदास हनवते कैलास खरावे सचिन राठोड नारायण त्यांचे नरेंद्र ताठे आनंद जाधव केशव खरावे अनिल चव्हाण अमोल भगवान लहाने गजानन फुपाटे रंजीत वायाळ खंडुजी लहाने राजेभाऊ नरोडे लक्ष्मण बोराडे बाजीराव बोराडे एम शेख दत्ता दहातोंडे वैभव शहाणे राजेश्वर कराळे सचिन रघुनाथ बोराडे कपिल तिवारी अन्साबाई राठोड वैभव नरवडे यांची उपस्थिती होती.
Leave a comment