बदनापूर । वार्ताहर
कोरोना संकटामुळे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश असतांना शहरातील काही दुकानदार पोलीस व नगर पंचायतच्या अधिकार्यांच्या नजरा चुकवून चोरी चोरी दुकानातून विक्री करीत असून अश्यायाच प्रकारे अर्ध शटर उघळून कपड्याची विक्री करणार्या दोन दुकानदारांना नगर पंचायत ने प्रत्येकी पाचशे तर आठ मोटरसायकल स्वरांना मास्क न वापरल्याप्रकर्णी प्रत्येकी शंभर रुपये दंड आकरला असून यापुढे दुकाने उघडल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
कोरोना प्रदुभाव होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जालना जिल्ह्यत जीवनावश्यक व शेती उपयोगी वस्तूंची दुकाने वगळून इतर सर्व आस्थपणा बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहे परंतु बदनापूर शहरातील काही व्यापारी दररोज अर्ध शटर उघळून व्यवसाय करीत आहे त्यामुळे लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन होत आहे बदनापूर शहरात कोरोना रोगाचा ङ्गैलाव होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक मारोती खेडकर,नगर पंचायत मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे,अभियंता गणेश ठुबे अहोरात्र परिश्रम घेत असतांना काही व्यापर्यांमुळे जमावबंदी व लॉक डाऊन आदेशाचे उल्लंघन होत असल्याने 7 मे रोजी मुख्य अधिकारी डॉ पल्लवी अंभोरे,गणेश ठुबे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर पंचायत पथक प्रमुख न्यानेश्वर रेवगडे,अशोक बोकन, हिम्मत कांबळे , सय्यद दस्तगीर, मिलिंद दाभाडे, रशिद पठाण यांनी शहरात पाहणी केली असता निरांकरी ङ्गॅशन व इडिया ड्रेसेस हे दोन कापड विक्रेता दुकानदार दुकानाचा अर्ध शटर उघळून विक्री करण्याचा प्रयत्न करीत असतांना आढळून आल्याने दोन्ही दुकानदारांना प्रत्येकी पाचशे तर मास्क वापर न केल्याप्रकरणी मोटरसायकल स्वार अरबाज सय्यद लियाकत,शिवाजी वैद्यजनार्धन जगताप,अमोल मैड, अय्यज पटेल,रवींद्र शिरसाठ,सतीश हिरगुळे,सुरेश जाधव यांना प्रत्येकी शंभर रुपये दंड आकारून तंबी दिली.
Leave a comment