जालना । वार्ताहर
अनेक दिवसांपासून मागणी करून ही मुळ गावी जाण्यासाठी रेल्वे मंञालयाच्या उदासीन धोरणामुळे प्रवासाची सुविधा उपलब्ध होत नसल्याने हताश झालेल्या मजूरांना काळाने कुटूंबियांपासून कायमचे हिरावून घेतले. या दुर्दैवी घटनेस जवाबदार असलेल्या रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुनराव खोतकर यांनी केली आहे. करमाड - सटाणा शिवारात रेल्वे रूळावर विसावा घेत असलेल्या जालना येथील लोखंडी कारखान्यात काम करणार्या कामगारांना मालवाहू रेल्वेने चिरडले. या दुर्दैवी घटनेविषयी दु: ख व्यक्त करत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले, लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मुळ गावी जाण्यासाठी मजूरांनी महिना भरा पासून मागणी केली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अडकलेल्या परप्रांतीय मजूरांची राज्य शासनाने सर्व व्यवस्था करून त्यांना मुळ गावी जाण्यासाठी केंद्राने रेल्वे ची व्यवस्था करावी अशी सर्वप्रथम मागणी केली. मात्र केंद्र शासन आणि रेल्वे मंञालयाच्या उदासीन धोरणामुळे रेल्वे सोडण्यास विलंब झाला. परिणामी गावी जाण्यासाठी व्यवस्था होत नसल्याने हतबल झालेल्या मजूरांनी रेल्वे रूळावरून पायपीट करत औरंगाबाद कडे प्रस्थान केले. करमाड शिवारात रेल्वे प्रशासनाने त्यांना पास सक्तीचा बडगा दाखवला. पोलीस प्रशासन सहकार्य करत असतांना रेल्वे प्रशासनाच्या आडमुठे पणामुळे मजूरांना रेल्वे रूळावर घेतलेला विसावा कायमचा ठरला. असे सांगून अर्जुनराव खोतकर यांनी वेळी च रेल्वे गाड्या मिळाल्या असत्या तर ही दुर्दैवी घटना टळली असती.असे त्यांनी नमूद केले. या घटनेस जवाबदार असलेल्या रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी नैतिक जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा अशी मागणी अर्जुनराव खोतकर यांनी केली.
केंदाने पंचवीस लाखांची मदत करावी...!
परदेशात असलेल्या धनदांडग्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र शासन सर्व तयारी करत आहे. मात्र देशाच्या कानाकोपर्यात अडकलेल्या गोर- गरीब मजूरांची चिंता नाही. असा आरोप करत माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले मृत मजूरांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली असून केंद्र शासनाने प्रत्येकी पंचवीस लाखांची मदत करावी अशी मागणी अर्जुनराव खोतकर यांनी केली.
Leave a comment