जखमीवर अंबड येथे खाजगी दवाखाण्यात उपचार सुरु
सुदैवानी कुठलीही जिवीतहानी नाही
तीर्थपुरी । वार्ताहर
अंबड तालुक्यातील रुई येथे दोनच्या सुमारास दोन बोरवेलसच्या ट्रक शेतात बोअर घेण्याकरीता जात असतांना नदी काठचा रस्ता कच्चा असल्याने रस्ता खचुन दोन्ही गाड्या पलटी झाल्याची घटना आज दि.8 रोजी पहाटेच्या सुमारास घडली.
या बाबत थोडक्यात माहिती अशी की,अंबड येथील श्री भद्रा बोरवेलच्या दहा टायर दोन गाड्या रुई येथील शेतकर्याच्या शेतात बोर घेण्यासाठी जात होत्या. गावापासुन रूई ते सिध्दैश्वर पिपळगावच्या कच्या नदी काठच्या रस्त्याने जात असताना अचानक नदी काठचा कच्चा रस्या असल्यामुळे दोन्ही गाड्या एका मागे चिटकुन जात असताना रस्ता खचल्यामुळे दोन्ही गाड्या नदीच्या कडेमध्ये कोसळल्या असुन यामध्ये राजेश भिसे, विठ्ठल भिसे दोघे सख्य भाऊ गभीर जखमी झाले असुन दोघांवरही अंबड येथे खाजगी दवाखाण्यात उपचार सुरु आहेत तर दोघे जण किरकोळ जखमी आहेत. यामध्ये दोन्ही गाड्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गाड्या बाहेर काढण्याचे काम दोन क्रेनच्या साह्याने चालु आहे तर घटना घडताच गावातील शेतात राहणारे अमोल चादंणे, द्वारकादास चादणे, भास्कर चांदणे, हनुमान चादंणे यांनी जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली तसेच सकाळी घटनास्थळी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसुन आली होती.
Leave a comment