पालकमंत्री राजेश टोपे यांनी लक्ष घालण्याची मागणी
तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यात जायकवाडी पाटबंधारे डाव्या कालव्यात शासनाने शेतकर्यांच्या सिंचन साठी पाणी सोडले असताना त्या कालव्याच्या पाण्यावर शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड उपसा सिंचन द्वारे केली असताना पण तीर्थपुरी विद्युत वितरण कंपनीच्या 33 केव्ही उपकेंद्र आतून भायगव्हाण ङ्गिडर एक दिवसाआड वीज पुरवठा शेतकर्यांच्या कृषी पंपांना देत असल्यामुळे कालव्यांना पाणी असून पिकांना पाणी देता येईना यामुळे उभे पीक पाण्याअभावी जळू लागल्यामुळे हजारो एकर ऊस तीन गावांमधून जळून जाण्याची भीती महावितरणच्या अभियंत्याच्या ढिसाळ नियोजनामुळे व्यक्त केली जात असून तरी जालना जिल्ह्याचे पालक मंत्री व घनसावंगी मतदार संघाचे आमदार राजेश टोपे यांनी जातीने लक्ष घालून शेतकर्यांना काल यावरून कृषी पंपांना वीज पुरवठा नियमितपणे सुरू ठेवावा अशी मागणी खापर्देव्हीवरा, भायगव्हाण, बाचेगाव येथील शेतकर्यांनी जालना जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेंद्र भाऊ पवार यांच्याकडे केली आहे.
सविस्तर माहिती अशी की या तीन गावांना शेतकर्यांच्या कृषीपंपासाठी तीर्थपुरी येथील ते तीस केवी उपकेंद्र तून भाई गव्हाण ङ्गिडर द्वारे वीज पुरवठा दिला जातो पण या ङ्गिडरवर संबंधित अभियंत्यांनी काही खाजगी कंत्राट दाराने विनापरवाना अवैध रीतीन ट्रांसङ्गार्मर बसविण्यात आल्याचा आरोप अनेकांनी केला असून तशी गुप्त माहिती घनसावंगी महावितरणची उपअभियंता निमजे साहेब यांना मिळाली असून त्यांनी सर्व माहिती घेतली आहे या बोगस ट्रांसङ्गार्मर बसविण्यात संबंधित अभियंता व काही कर्मचारी खाजगी कंत्राटदार यांचा अहवाल वरिष्ठांना देणार असून असे कळते तसेच यातीन गावांना मोठ्या प्रमाणात ऊस लागवड समर्थ सहकारी साखर कारखाना सागर या कार्यक्षेत्रात उसाची लागवड केली असताना पण दोन महिन्यापासून या तिन्ही गावांना जायकवाडी डाव्या कालव्याद्वारे कृषी पंप बसविण्यात आले पण या कृषी पंपांना एक दिवसा आड त्यामध्ये आठ तासांमध्ये दोन तास पुरवठा वारंवार खंडित होणे तांत्रिक कारणावरून बंद करणे काही खाजगी लोक महावितरणची कामाच्या नावाखाली संबंधित उपकेंद्रात ऊन वीज पुरवठा परमिट घेऊन बंद करणे या प्रकारामुळे शेतकर्यांना आठ तासा मधून पाच ते सहा तास वीज पुरवठा एक दिवसा आड मिळतो यामुळे शेतकर्यांच्या पिकांना या कडक उन्हाळ्यात पाणी मिळत नसल्यामुळे उसाचे मोसंबी केळी पिके पाण्याअभावी जळू लागली असून यामुळे महावितरणच्या अभियंत्यांचे म्हणणे असे की हे ङ्गिटर ओव्हरलोड होते म्हणून वीज पुरवठा एक दिवस आड करण्यात आला पण या ङ्गिडरवर यापूर्वी असा प्रकार कधीच झाला नाही ही या वर्षीच कसा झाला यामुळे संबंधित अभियंता परशे यांची विभागीय चौकशी करावी अशी मागणी तिन्ही गावातील शेतकर्यांमधून केली जात आहे तसेच पालकमंत्री राजेश टोपे यांनी यातीन गावाच्या वीज प्रश्नासाठी हे ङ्गिटर होत असल्यास सागर सहकारी साखर कारखाना किंवा घनसावंगी येथून आलेले एक्सप्रेस ङ्गिटर मधून बाचेगा भाई गव्हाण या दोन गावांना कृषी पंपांना वीज पुरवठा दोन महिन्यासाठी जोडल्यास ही समस्या सुटू शकेल पण तीर्थपुरी वि व घनसावंगी येथील शाखा अभियंता उप अभियंता निमजे साहेब यांनी लक्ष घातल्यास कालव्याची पाणी शेतकर्यांना कृषी पंपाद्वारे आठ तास मिळू शकेल पण संबंधित शाखा अभियंता यांची ढिसाळ नियोजन व शेतकर्यांच्या समस्या कडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे शेतकर्यांना दोन महिन्यापासून विजेचा लपंडाव एक दिवस आड वीजपुरवठा या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत असून उभी पिके या अभियंत्याच्या ढिसाळ कारभारामुळे जळून जात आहेत यामुळे जालना जिल्ह्य परिषद उपाध्यक्ष महेंद्र भाऊ पवार यांनी या शेतकर्यांच्या प्रश्न समस्या सोडविण्यासाठी संबंधित भैय्यासाहेब व महावितरणचे निमजे व शाखा अभियंता पळसे यांना विचारात घेऊन तात्काळ प्रश्न दोन-चार दिवसात सोडण्यात यावा अशी कळकळीची मागणी शेतकर्यां मधून केली जात आहे एक तर या तीन गावांना कालव्याला पाणी असून पाणी घेता येईना लॉक डाऊन संचार बंदी असल्यामुळे महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा न्यावा तर सोशल डिश सिंग उल्लंघन होईल म्हणून शेतकरी वर्ग घराच्या बाहेर पडेना यामुळे शेतकरी कात्रीत सापडला असून यामुळे घनसावंगी मतदार संघाची आमदार राजेश भैय्या टोपे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष महेंद्र भाऊ पवार यांनी लक्ष घालावे अशी मागणी तिन्ही गावातील शेतकर्यांमधून केली जात आहे.
Leave a comment