कारवाईसाठी पिंपळगाव रेणुकाई येथील नागरिकांची आयुक्ताकडे धाव
पिंपळगाव रेणुकाई । वार्ताहर
भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई येथील स्वस्त धान्य दुकानदार कार्डधारकांना नियमानुसार धान्य वाटप करत नसल्याची तक्रार गावकर्यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी तसेच तहसीलदारांकडे केली होती मात्र तहसिलदारांनी त्या दुकानदारांची चौकशी न करता उलट तक्रारदारांना तुम्हीच गावातील शांतता भंग करीत आहात स्वस्त धान्य दुकानदार नियमानुसार वाटप करीत असल्याचे सांगून अशा भ्रष्ट स्वस्त धान्य दुकानदारांना पाठीशी घालून दिल्याने कार्यवाहीसाठी गावकर्यांनी आता विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पिंपळागाव येथे स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षापासून रेशन कार्डधारकांना कमी धान्य वाटप करीत असल्याची ओरड आहे सदर धान्याची काळ्याबाजारात विक्री केली जात आहे.
याबाबत अनेकदा अन्नपुरवठा विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली.मात्र या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यात आली नाही. स्वस्त धान्य दुकान दाराला तालुका प्रशासनाचे अभय असल्याने स्वस्त धान्य दुकानदाराचा जागतिक महामारीमुळे शासनाने कायदा व सुव्यवस्था तसेच अन्नधान्य वितरण व्यवस्था सुरळीत चालावी म्हणून गाव पातळी वर शासकीय नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली या समितीकडे गावातील गावकर्यांनी स्वस्त धान्य दुकानदारां विरुद्ध स्वस्त धान्य दुकानदार जास्तीचे पैसे घेत असल्याची तक्रार केली होती. त्या अनुषंगाने पिंपळगाव येथील तीनही स्वस्त धान्य दुकानांचा पंचनामा केला असता त्यामध्ये अभिप्राय बुक. भाव ङ्गलक. तक्रार बुक. बिल न देणे.यामध्ये अशा अनेक त्रुटी आढळल्या होत्या .पिंपळामध्ये कार्ड धारकांची संख्या 1200 च्या जवळपास आहे. प्रत्येक कार्डधारकाला स्वस्त धान्य दुकानदार 50 रुपये जादा दराने आकारणी करुन जास्त पैसे उकळत आहे. या दरम्यान ग्रामपंचायत मध्ये स्वस्त धान्य दुकानदारांच्या विरोधात विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली असून सदर तहसीलदार व तालुका पुरवठा अधिकारी यांचेवर कठोर कार्यवार्ई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर समाधान भाऊसाहेब देशमुख. पंडित नरवाडे. बाबुराव बेराड.शैलेश बोर्डे.कडुबा देशमुख. समाधान सुभाषराव देशमुख. भगवान गावंडे. गणेशराव देशमुख. शिवनारायण आहेर. दिलीप आहेर. राधाकिसन भोसले. रामदास जाधव. अंकुश डाखुरकर.कृष्णा बेराड.गजानन गाडेकर. कृष्णा देशमुख. बाबुराव सोनवणे.भिकनराव देशमुख. आदिंच्या स्वाक्षर्या आहेत.
Leave a comment