बदनापूर । वार्ताहर

कोरोना या विषाणूचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत चालेला असल्यामुळे ग्रामीण भागातही याची लागण होऊ नये म्हणून शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून बदनापूर तालुक्यातील 79 गावांना  ङ्गवारणी करण्याकरिता सोडियम हाइपोक्लोराईट हे औषधाचे मोङ्गत वितरण पंचायत समिती सभागृहात गावातील ग्रामसेवकांकडे वितरीत करण्यात आले. कोरोना रोगाचा प्रार्दूभाव दिवसेंदिवस वाढत चाललेला असल्यामुळे ग्रामीण भागातही या विषाणूचा प्रार्दूभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे युवासेनेचे जालना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे यांनी शिवसेना, युवा सेना, कै. एकनाथराव घुगे प्रतिष्ठाण, ग्रामीण विकास प्रतिष्ठाण, बदनापूर यांच्यावतीने बदनापूर तालुक्यातील 79 गावांत ङ्गवारणीसाठी सोडियम हाइपोक्लोराईट औषधी वितरण कार्यक्रमाचे आयोजन बदनापूर येथील पंचायत समिती कार्यालयात सोशल डिस्टेन्सींग चे पालन करून करण्यात आले होते. यावेळी माजी आ.संतोष सांबरे, किसान सेनेचे जिल्हाप्रमुख भानुदास घुगे, उपजिल्हाप्रमुख भगवान कदम, बदनापूर पंचायत समितीच्या सभापती शिंदे, उपसभापती रवी बोचरे, भरत मदन, अरूण डोळस, श्रीराम कान्हेरे, नंदकिशोर दाभाडे, गोरखनाथ लांबे, शहर शिव सेना प्रमुक बदनापूर राजेंद्र जर्‍हाड, कैलास खैरे आदींची उपस्थिती होती. 

प्रास्ताविक करताना भाऊसाहेब घुगे यांनी सांगितले की, शिवसेना व युवा सेनेच्या माध्यमातून लॉकडाऊन काळात तालुक्यातील गरजूंना अन्नधान्य किट तसेच भाजीपाला किट वाटप करण्यात आल्या. लॉकडाऊन वाढत चालल्यामुळे नाम संघटनेच्या माध्यमातूनही अन्नधान्य, किराणा वाटप कार्यक्रम घेण्यात आले. त्यानंतरही आता शिवसेना व युवासेनेच्या माध्यमातून तालुक्यातील 79 गावांत ङ्गवारणी करण्याकरिता सोडियम हाईपोक्लोराईट या औषधाच्या कॅनचे वाटप करण्यात येत आहे. 2000 लोकवस्तीपेक्षा कमी असलेल्या गावांसाठी पाच लिटरची कॅन तर त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या गावांसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात दोन कॅन देण्यात येणार असून ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक व सरपंच यांनी आपल्या गावात ट्रॅक्टर किंवा ब्लोअरने याची ङ्गवारणी करावी, असे सांगितले. भानुदास घुगे यांनीही सद्य पस्थितील कोरोनाशी लढताना ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामसेवकांनी घ्यावयाची काळजी या बाबत मार्गदर्शन केले. माजी आ. संतोष सांबरे यांनी या प्रसंगी ग्रामीण भागात या विषाणूची लागण होऊ देऊ नये म्हणून शिवसेना व युवासेनेने सुरू केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करून गावातील सरपंच व ग्रामसेवक यांची जबाबदारी वाढली असल्याचा उल्लेख केला. शिवसेनेच्या माध्यमातून अन्नधान्य,  भाजीपाला, किराणा सामान वेळोवेळी तालुक्यातील गरजूंना देण्यात आलेले असून लवकरच आणखी अन्नधान्य वाटप करण्यात येणार असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील सरपंच व ग्रामसेवक यांनी गावात या कॅनमधील औषधांची ङ्गवारणी करताना एक लीटर पाण्यात 50 मिली हे औषधी एकत्रित करून ङ्गवारणी करावी, तसेच प्रत्येक गावाने आपले गाव विषाणूमुक्त कसे राहील याची जबाबदारी घेण्याची गरज यावेळी व्यक्त केली. याच कार्यक्रमात शिवसेनेचे पंचायत समितीचे उपसभापती रवी बोचरे यांनी 11 हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. 10 ग्रामपंचायत्च्या सरपंच, ग्रामसेवकांना यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात या औषधाचे वाटप करण्यात आले असून इतर ग्रामपंचायतला ते गावात नेऊन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.