लोखंडे पती-पत्नीचा अभिनव उपक्रम
मंठा । वार्ताहर
मंठा तालुक्यात तलाठी म्हणून कार्यरत असलेले मंगेश शंकर लोखंडे व तेजस्विनी मंगेश लोखंडे यांनी देवी रोड ते टोकवाडी या रोडच्या दोन्ही बाजूस करण्यात आलेली वृक्षारोपण स्वखर्चातून टँकरने पाणी देऊन यशस्वीपणे जगवली आहेत मंठा येथे सध्या रहिवासी असलेले शिरवळ जि.सातारा येथील लोखंडे पती-पत्नी दोघेही तलाठी असून मंठा तालुक्यातील मंठा तालुक्यातील अनुक्रमे शिवगिरी व जयपूर या ठिकाणी कार्यरत आहेत. शासकीय काम सांभाळतात वृक्षारोपण, त्यांची संगोपन करणे हे शासनाचे काम असले तरी आपण या परिसरात राहतो. त्यामुळे आपण या परिसराचे काही देणे लागतो या उद्देशातून तसेच येथील रेणुका माता मंदिर परिसरात निसर्गरम्य वातावरणामध्ये पाण्याअभावी हिरवळ दिसून येत नाही.
दरवर्षी शासनाच्या वतीने वृक्षारोपण केल्या जाते. पण त्याचे संगोपन होत नाही. सकाळी रोज मॉर्निंग वॉकला गेल्यानंतर वाढत्या उष्णतेने सुकून जात असलेली बाल वृक्ष पाहून त्यांना जगण्याची इच्छा मनात निर्माण झाली. व या महत्वकांक्षी तून स्वखर्चाने सदरील वृक्षांना टँकरद्वारे पाणी देण्याचे कार्य हाती घेतले. प्रत्येक 12 ते 14 दिवसांमध्ये टँकरने पाणी दिल्याने ही झाडे आता जगली आहेत. महिन्याला तीन ते चार हजार रुपये खर्च करून ही झाडे जगविण्याची ध्येय पार पाडत आहेत हा सर्व प्रकार टोकवाडी येथील दक्षता समिती अध्यक्ष अशोक (नाना) यांनी तहसीलदार श्रीमती सुमन मोरे यांच्या निदर्शनास आणून दिले. त्याची प्रत्यक्ष पाहणी करून तहसीलदार श्रीमती सुमन मोरे, अशोक (नाना) वायाळ सरपंच हरीभाऊ जाधव, ग्रा.प. सदस्य विलास जाधव, बाबासाहेब गाडेकर, अंबादास जाधव, अशोक राठोड, यांनी टोकवाडी ग्रामस्थ व मंठा तालुक्यातील जनतेच्या वतीने श्री लोखंडे पती-पत्नी यांचे आभार मानले. व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Leave a comment