मनसे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांची मागणी
जालना । वार्ताहर
लॉकडाऊन काळात मद्य सम्राटांनी गैरमार्गाने केलेल्या दारू विक्री ची सखोल चौकशी करून परवाने निलंबित करावेत तसेच सोशल डिस्टन्सींग च्या नियम व अटींवर दारू विक्री ची दुकाने व परमिट रूम उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केली आहे. या संदर्भात बुधवारी ( ता. 06) जिल्हाधिकारी यांना मनसे च्या वतीने दिलेल्या लेखी निवेदनात राहुल रत्नपारखे यांनी म्हंटले आहे की, लॉकडाऊन च्या संकटामुळे राज्याची अर्थव्यवस्था धोक्यात आली असून शासनाने महसूल मिळण्यासाठी मद्य विक्रीसाठी परवानगी द्यावी असे सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सुचवले होते.
अखेर राज्य शासनाने त्यांनी मांडलेली सूचना मान्य केली असून राज्यात दारू विक्री स परवानगी दिली आहे.असे नमूद करत राहुल रत्नपारखे म्हणाले की,लॉकडाऊन काळात मद्य विक्रेत्यांनी गोदामात साठवलेल्या साठ्याची परस्पर विल्हेवाट लावत शासनाचा मोठ्या प्रमाणात महसूल बुडवला आहे. या सर्व गैरप्रकाराची उत्पादन शुल्क विभागा मार्ङ्गत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावे आणि कायमस्वरूपी परवाने निलंबित केले जावेत अशी मागणी करण्यात आली. राज्य शासनाने दारू विक्री करणार्या व्यावसायिकांना मार्गदर्शक अटी व नियम घालून दारू विक्री करण्यासाठी परवानगी दिली आहे. तथापि जालना जिल्ह्यात सर्व परवाना धारकांना दारू विक्री करण्यासाठी परवानगी देतांना वाईन शॉप वर गर्दी उसळून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो हे लक्षात घेता.वाईन शॉप वरील गर्दी कमी करावी , सोशल डिस्टन्सींग चे तंतोतंत पालन होऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी परमिट रूम धारकांना पार्सल दारू विक्री ची परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्सींग च्या दृष्टीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व मनसे सैनिक पोलीस प्रशासनास सहकार्य करतील. असे राहुल रत्नपारखे यांनी सांगितले. निवेदनावर शहराध्यक्ष राहुल रत्नपारखे महेश नागवे, संजय राजगिरे, गणेश धांडे, शरद मांगधरे , आकाश जाधव,अजय मोरे पंकज घोगरे, नितीन राठोड, सुरेश वैद्य, अमोल जाधव, कोळकर जोहेब शेख यांची नावे आहेत.
Leave a comment