औरंगाबाद । वार्ताहर
सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी सदय परिस्थितीत कोरोना व्हायरस (कोविड 19) संसर्ग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने राज्यात असलेल्या लॉकडाऊनमुळे सोशल डिस्टनसिंगचे पालन करुन व्हिडिओ कॉन्फरसिंग ब्दारे बोर्ड मिटींग घेण्याच्या परवानगीस उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन मराठवाडयातील जिल्हा बँकामध्ये प्रथमच व्हिडिओ कॉन्फरसिंग व्दारे दिनांक 06/05/2020 रोजी संचालक मंडळाची मासिक सभा औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतली आहे.
सदरील सभा बँकेचे अध्यक्ष मा.श्री.नितीनजी सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदरील व्हिडिओ कॉन्फरसिंग सभेस बँकेचे सन्माननीय संचालक मा.ना.श्री.संदीपानजी भुमरे, कॅबीनेट मंत्री (रोजगार हमी व फलोत्पादन), मा.ना.श्री.अब्दुलजी सत्तार, राज्यमंत्री (महसुल व खार जमीनी), मा.आ.हरीभाऊजी बागडे, (माजी विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य), मा.खा.मा.श्री. रामकृष्णजी बाबा पाटील, श्री.किरणजी पाटील डोणगांवकर, श्री.रंगनाथरावजी काळे, श्री.पुंडलीकरावजी जंगले, श्री.अशोकजी मगर, श्री.दशरथजी गायकवाड, श्री.जावेदजी पटेल, श्री.फारुखजी रऊफ शेख, मा.अॅड.श्री.शांतीलालजी छापरवाल व कर्मचारी प्रतिनिधी श्री.के.यु.गोर्डे इत्यादींनी विविध विषयावर सखोल चर्चा करुन सभेत आपला सहभाग नोंदविला. सभेस मुख्य कार्यालयात उपाध्यक्ष मा.श्री. दामोधरजी नवपुते, संचालक मा.श्री.नंदकुमारजी गांधीले, मा.विभागीय सहनिबंधक श्री.योगीराजजी सुर्वे, मा.जिल्हा उपनिबंधक श्री.अनिलकुमारजी दाबशेडे, कार्यकारी संचालक श्री.आर.आर.शिंदे व सरव्यवस्थापक श्री.ए.टी.मोटे हे उपस्थिती होते.
ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a comment