औरंगाबाद । वार्ताहर

लॉकडाउनमुळे परराज्यातील असंख्य मजुर, कामगार संभाजीनगर शहरामध्ये अडकून पडले आहेत. लॉकडावुन लागु झाल्यानंतर हाताला काम न राहिल्यामुळे हे मजुर अडचणीत आले आहेत. आता त्यांना बाहेर जाण्याची मुभा देण्यात आली आहे, मात्र त्यासाठी डॉक्टरांचे फिटनेस प्रमाणपत्र घेणे गरजेचे केले आहे. शहरातुन बाहेर जाण्यासाठी डॉक्टरांचे आरोग्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आहे. त्यासाठी मनपाच्या आरोग्य केदामध्ये प्रमाणपत्र देण्याची सोय केली आहे परंतु तिथे रांगा लागत असल्यामुळे याठिकाणी सोशल डिस्टेंस्टचा वापर नागररिकांकडून केला जात नाही. त्यामुळे शिवसेना संभाजीनगरच्यावतीने खाजगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांसाठी आरोग्य प्रमाणपत्र देण्याची सोय शिव सहाय्यता केंद्राच्या माध्यमातुन करण्यात आली आहे असे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांनी कळविले आहे.

 शिवसेना संभाजीनगरवतीने सुरु करण्यात आलेल्या शिव सहाय्यता केंद्रातर्फे आमदार अंबादास दानवे यांच्या संपर्क कार्यालयातील 9028088889 या व्हाटसअ‍ॅप  क्रमांकवर संपूर्ण अर्जदाराची माहिती मागवुन व काही अडचण असल्यास 0240-2357799 यावर संपर्क करावा आणि त्यांनतर जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्या पत्रावरुन खाजगी हॉस्पिटल जे.जे.प्लस हॉस्पिटल, प्लॉट नं. 25, जिल्हा न्यायालयासमोर बाबा पेट्रोल पंप, जालना रोड, केअरवेल हॉस्पिटल, प्लॉट नं. 11, व्यंकटेशनगर, एसएफएस शाळेसमोर, जालनारोड, श्री गजानन हॉस्पिटल अ‍ॅण्ड किटीकल केअर युनिट आर. एम.8, महाराणाप्रताप चौक, वाळुज, एमआयडीसी, बजाजनगर, निमाई हॉस्पिटल बाहेती कॉम्पलेक्स, भगतसिंग शाळा, बजाजनगर यांना अर्जदाराची माहिती देवुन आरोग्यपत्र मिळविण्यासाठी नागरिकांना आरोग्य प्रमाणपत्र देण्यात येईल त्यामुळे आता अडकून असलेल्या मजुरांना आणि लोकांना त्यांच्या घरी जाता येणार आहे. असे जिल्हाप्रमुख तथा आमदार दानवे यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.