प्रतिनिधी सिल्लोड
गरपरिषद , उपजिल्हा रुग्णालय ,धन्वंतरी डॉक्टर असोसिएशन यांच्या सह प्रत्येक प्रभागातील 2 असे एकूण 36 पथक तयार करण्यात आले यात नगरपरिषदेतील नगर सेवक न प कर्मचारी याचा देखील समावेश करण्यात आला आहे हे पथक रोज प्रत्येक प्रभागात जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करणार आहेत.
देशात व राज्यात कोरोना चे संकट वाढल्या पासून सर्वच राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी आपापल्या मतदारसंघात थांबवुन नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत याच अनुषंगाने सिल्लोड नगर परिषदेच्या मध्येमातून राज्यमंत्री आ मा अब्दुल सत्तार यांनी देखील विविध उपक्रम राबविले मोफत अन्नधान्य, सॅनिटायजर,साबण, गरजूंना अन्नाचे पाकिटे ,असा उपक्रम लॉकडाऊन चालू झाल्या पासून सुरू आहे आता यात नवीन उपक्रम नागरिकांसाठी एक पुढचे पाऊल म्हनून मा सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदेने डॉक्टर आपल्या दारी ही नवीन योजना नागरिकांसाठी आणली आहे कोरोना च्या सावटाखाली वावरत असलेल्या नागरिकांच्या मानतील भीती दूर करण्यासाठी तसेच त्याची आरोग्य तपासणी करून शहर कोरोना मुक्त ठेवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जात आहे शहरातील 13 प्रभागामध्ये प्रत्येक घरात जाऊन सर्दी ,खोकला ,ताप आदी तक्रारी असलेल्या नागरिकांची डॉक्टरांनकडून आरोग्य तपासणी करणार आहेत. शहरात हा प्रोयोग यशस्वी झाल्यानंतर दुसर्या टप्प्यात ग्रामीण भागात देखील जाऊन नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येईल असे राज्यमंत्री आ मा अब्दुल सत्तार म्हणाले लोकांच्या मनातील भीती कडून आजूबाजूच्या गावातील परिसरातील कोणी बाहेरची व्यक्ती अली तर त्याची माहिती पोलीस ,प्रशासनाला देऊन आपले घर आणि शहर को रोना मुक्त ठेवावे असे आवाहन मा सत्तार यांनी केले.
Leave a comment