औरंगाबाद । वार्ताहर
कोरोना (कोविड) विरुद्धच्या लढ्यात लढा देत असलेल्या प्रत्येक डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आदींसह सर्वच कोरोना योद्ध्यांच्या खंबीरपणे प्रशासन पाठिशी आहे. कोरोना योद्धे मागील दीड महिन्यापासून अहोरात्र समाजाची सेवा करताहेत, ही भूषणावह बाब असल्याची भावना जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी व्यक्त केली.
जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी आज भेट देऊन वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, कर्मचारी, औषध निर्माण अधिकार्यांशी सोशल डिस्टसिंगचे पालन करत संवाद साधला. त्यांच्या अडिअडचणी जाणून घेतल्या. शिवाय कोरोना लढ्यात करावयाच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शनदेखील केले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात कोरोना योद्ध्यांचे काम अत्यंत महत्त्वाचे आहे, हा लढा आपण तुमच्या विश्वासावर जिंकून दाखवूच, असा विश्वासही कोरोना योद्ध्यात निर्माण केला. तसेच त्यांच्या कार्याचे कौतुक करत श्री. चौधरी यांनी प्रोत्साहनही दिले.
Leave a comment