सोयगाव,दि.6(प्रतिनिधि

)सोयगाव तालुक्यातील घोसला ग्रामपंचायत सतर्क झाली असून या ग्रामपंचायतीने घराघरात ग्रामस्थांना जनजागृती करून आरोग्य विषयक काळजी घेण्याबाबत जनजागृती करून गावात प्रत्येक घरात सॅनिटायझर मोफत वाटप केल्याने या गावातील प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर वापरायला मिळत आहे.

घोसला ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती पाटील,ग्रामसेवक साहेबराव मोरे यांनी ग्रामस्थांच्या मदतीने हा उपक्रम हाती घेवून गावात ठिकठिकाणी स्वच्छता,फवारणी करून प्रत्येक नागरिकाला सॅनिटायझर,मास्क वितरण केले.तसेच कोरोना संसर्गात सक्षम भिंत म्हणून काम करणार्‍या पोलीसांच्या आरोग्याचीही काळजी घेणे कर्तव्य समजून सोयगाव पोलीस ठाणे,पंचायत समिती कार्यालय आदी ठिकाणीही मोफत सॅनिटायझर,मास्क वितरण करण्यात आले यावेळी सरपंच पती प्रकाश पाटील,ग्रामसेवक साहेबराव मोरे यांच्या हस्ते पोलीस ठाणे,पंचायत समिती आदी ठिकाणी वितरण करण्यात आले.

Leave a comment

Switch to plain text editor

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.