परतूर । वार्ताहर

गेल्या चाळीस-बेचाळीस दिवसापासून कोरोणा महामारीने देशात व महाराष्ट्रात थैमान घातले आहे अशा परीस्थीती आ.बबनराव लोणीकर यांच्या माध्यमातुन परतूर विधानसभा मतदार संघासह शहरातील जनतेच्या अडीआडचणी आ.बबनराव लोणीकर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते थेट गरजूंपर्यत मदत पोहचवण्याचे काम करीत आहेत या पाश्‍वभूमीवर आज आमदार बबनराव लोणीकर यांनी परतूर शहरातील नागरीकांसी व्हि.डि.ओ. कॉन्ङ्गरंसींगद्वारे संवाद साधला.यावेळी त्यांनी कोरोणा महामारीच्या काळात आपण सर्वानी घरीच थांबून कोरोणाला हरवण्या संदर्भात सुचना केल्या. या वेळी शहरातील गोरगरीब जनतेपर्यत केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वस्तधान्य वाटपचे वितरण व्यवस्थीत झाले का याच बरोबर जनधन योजनेच्या लाभार्थाना लाभ मिळाला किंवा नाही तसेच पी.एम. किसान योजनेतील रक्कम मिळाली का त्याच सोबत शहरातील स्वच्छता, निर्जतूकीकरण करण्या संदर्भात थेट जनतेकडूनच जाणून घेतले. आरोग्यासंदर्भात कूठल्या प्रकारच्या अडचणी येत आहेत हे सगळे प्रश्‍न जाणून घेत अडचणी सोडवण्या संदर्भात आपण कटीबध्द आसल्याचे यावेळी ते म्हणाले.

त्याच बरोबर आ.लोणीकरांच्या माध्यमातुन भाजपा नगरसेवक तसेच प्रतिष्ठीत कार्यकर्त्यानी गरजूनां केलेल्या मदती संदर्भात भाष्य करतांना शहरातील व ग्रामीण भागातील कार्यकर्त्यानी संकटाच्या काळात मदतीचा ओघ रंजल्या गांजल्या साठी अव्यवाहतपणे सुरू ठेवला असून त्यात गोर गंरीबांना धान्य वाटप आसेल, सॅनीटायझर, साबण इत्यादीसह जिवनावश्यक वस्तुचे वाटप करून मानवताधर्म वृध्दींगत केला आसल्याचे ते म्हणाले. असेच संकटाच्या काळात जनसामान्यांच्या सेवेस वाहून घेण्याचे सांगतांनाच स्वत: ची काळजी घेण्याचे सांगीतले. यावेळी नागरीकांनी उप।स्थित केलेल्या समस्या संदर्भात आपण जिल्हाधिकारी, मुख्यसचिव, पोलीस अधिक्षक, उपविभागीय अधिकारी यांना योग्य त्या सुचना देऊन समस्या सोडवणार आसल्याचे ते म्हणाले. मतदार संघातील पुणे, मुंबई, औरगांबाद यासह इतर जिलहयात अडकलेल्या विद्यार्थि कामाच्या निमीत्ताने बाहेर जिलहयात असलेले कामगार यांना मतदार संघातील आपआपल्या गावी परतण्यासाठीची प्रक्रीया पुर्ण होत आसून लवकरच् त्यांना आपल्या गांवी परतता यावे यासाठी शासनस्थरावर प्रयत्न करीत आसून लवकरच संबधीताना आपआपल्या गांवी परत येता येईल आसा आशावाद त्यांनी व्यक्त केला   या व्हिडीओ कॉन्ङ्गरंस ला भाजयूमो प्रदेशउपाध्यक्ष राहूल लोणीकर यांच्यासह भगवानराव मोरे, दया काटे, डॉ. सुखराज कोटेचा, सुधाकरराव सातोनकर, संदिप बाहेकर, शामसिंग ठाकूर खय्युमखाँ पठाण, ओम सेठ मोर, जगदिश झंवर, दिलीप होलाणी दिनेश होलाणी कृष्णा आरगडे, प्रकाश चव्हाण, जगन बागल, तारेख सिद्दीकी, प्रविण सातोनकर, सुबोध चव्हाण, मुन्ना चित्तोडा, किशोर कद्रे, राजेद्र मुंदडा, गोंवीद मोर, लालजी निर्वळ, सोनू अग्रवाल, अर्जुन पाडेवार, ज्ञानेश्‍वर जईद, गुड्डू राऊत, आजित पोरवाल, प्रमोद राठोड, अमोल अग्रवाल, मलीक कूरैशी, रङ्गीक कूरैशी, मुज्जु कायमखानी, परवेज देशमुख, आमर बगडीया, जितू मोर, शिवाजी बल्लमखाने, गजानन चव्हाण, बालाजी सांगूळे, आमोल हरजूळे, विशाल ढवळकर, सतिश सोनवणे आदिसह शहरातील नागरीकांनी सहभाग नोंदवला.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.