परतूर । वार्ताहर
तालुक्यातील शेतकर्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकर्यांच्या बँक खात्यात पैसे येऊन पडले असताना शेतकर्यांना मिळत नसल्याची माहिती कार्यकर्त्याकडून मिळताच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा माजी जि.प.उपाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी तत्काळ दखल घेऊन बँकांना सूचना करत परतूर तालुक्यातील शेतकर्यांनचे एक कोटी पंचवीस लाख तर मंठा तालुक्यातील शेतकर्यांना सत्तर लाख रुपये उपलब्ध करण्यात आले. आले असल्याची माहिती राहुल लोणीकर यांनी दिली. तालुक्यातील जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे जमा झालेली रक्कम मिळत नसल्याने शेतकरी बँकेत मार्च महिन्यापासून हेलपाटे मारत होते. सध्या शेतकरी अर्थीक अडचणीत सापडला आहे.
बँकेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकर्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागत आहे. शेतकर्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने शेतकर्यांना दरवर्षी सहा हजार रुपये अनुदान प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर करून थेट शेतकर्याच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येत आहे. मात्र ज्या शेतकर्याने राष्ट्रीयकृत बँकेचे खाते दिले त्यांना तत्काळ पैसे मिळत आहेत. मात्र जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेतून शेतकर्यांना वेळेवर पैसे मिळत नसल्याने शेतकरी बँकेत हेलपाटे मारत त्रस्त आहेत. सध्या कोरोनाच्या कोंडीत शेतकरी सापडला आहे. पुढील महिन्यात पेरण्या व लागवड करण्यासाठी बी.बियाणे खत औषधी खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याने शेतकर्यांना पी.एम. किसान सन्मान निधीच्या पैशाचा आधार मिळत असल्याने शेतकर्यांना हातभार लागत आहे. शेतकर्यांच्या खात्यात जमा झालेली रक्कम तत्काळ देण्यात यावे अशी मागणी शेतकरी वर्गातून होत होती. याची माहिती मिळताच राहुल लोणीकर यांनी परतूर मंठा तालुक्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेत शेतकर्यांचे पैसे अडकलेल्या रकमेचा आकडा घेत परतूर तालुक्यात सव्वा कोटी तर मंठा तालुक्यात सत्तर लाख रुपय शेतकर्यांची वाटप बाकी होती. कुठल्याही प्रकारे जालना जिल्हा मध्यवर्ती शाखेत उपलब्ध पैसे नव्हते. जालना येथील बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत ङ्गोन वर कडक भूमिका मांडत कुठल्याही परिस्थितीत पैसे शेतकर्यांना मिळाले पाहिजे. यापुढे शेतकर्यांची तक्रार येऊ देऊ नका आणि आता शेतकर्यांना पैश्याची गरज आहे. तत्काळ पैसे बँकांना द्या अशी ठाम भूमिका घेतल्याने शेतकर्यांना दोन कोटी रुपये बँकांना प्राप्त झाले आहेत. युवानेते राहुल लोनिकारांच्या भूमिकेमुळे शेतकर्यांना तत्काळ पैसे मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. शेतकर्यांचे जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून पी.एम.किसान सन्मान योजनेचे पैसे गेल्या मार्च महिन्यापासुम्न शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा होऊन मिळत नसल्याने शेतकरी बँकेत चकरा मारत होते. हि बाब बँकेचे संचालक राहुल लोणीकर यांच्या निर्दशनास मी आणून दिली. त्यांनी यांची तातडीने दखल घेऊन परतूर मंठा तालुक्यातील शेतकर्यांना एक कोटी 95 लाख रुपये बँकांना प्राप्त झाले आहे. यामुळे शेतकर्यांचे समाधान झाले. अडचणीत शेतकर्यांना पैसे मिळाले हे विशेष.. सरपंच शत्रुघ्न कणसे, दैठणा बु.
Leave a comment