कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगाव येथील सीसीआय कापूस खरेदी केंद्राला जिल्हा उपअधिकारी नानासाहेब चव्हाण यांनी ता.6 बुधवार रोजी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला शेतकर्यांचे म्हणणे ऐकून परिस्थिती कठीण असल्याकारणाने कुंभार पिंपळगाव सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर 9500 शेतकर्यांची नाव नोंदणी असून रोज दहा शेतकर्यांचा कापूस घेतल्यास दोन-तीन वर्षे लागतील याबाबत उपाययोजना करण्यात याव्यात असे शेतकर्यांनी म्हटले आहे अंबड आणि घनसावंगी दोन्ही तालुक्यात एक केंद्र असल्याने येथील गर्दी कमी होणार नाही यासाठी नवीन प्रायोगिक तत्त्वावर अंबडमध्ये कापूस खरेदी केंद्र सुरू करावे नसता अंबड तालुक्यातील शेतकर्यांचा कापूस जालना व बदनापूर येथे परवानगी घेऊन शेतकर्यांना तसं कळविण्यात यावे असे या भेटीदरम्यान उपस्थित शेतकर्यांनी म्हटले आहे.
बाजार समिती कडून मागणी रोज 20 वीस वाहने सध्या घेण्यात यावे असे बाजार समितीच्या वतीने तशी मागणी चव्हाण यांच्याकडे या वेळी करण्यात आली आहे कुंभार पिंपळगाव येथील कापूस खरेदी केंद्रावर काम करणार्या परराज्यातील मजूर शासनाची परवानगी घेऊन ते निघून गेले आहेत. त्यामुळे येथील खरेदी केंद्रावर मजुरांचीही अडचण येत आहे .कोरोनाच्या उद्भवलेल्या परिस्थितीत मंजुर मिळत नाहीत. सध्या स्थानिक मजुरांच्या आधारे सीसीआय कापूस खरेदी केंद्रावर काम सुरू आहे सरकीचे भाव कमी झाल्याने सरकीचा उठाव होत नाही .गोडाऊन खाली नसल्याने सरकी टाकण्यास जागा नाही. त्यामुळे कापूस खरेदीचा वेग वाढवता येत नाही. यामुळे शेतकर्यांचे हाल होत असून अनेक शेतकर्यांचा कापूस मे अखेरही घरातच आहे या सर्व परिस्थितीचा आढावा घेत चव्हाण यांनी अंबड तालुक्यातील नोंदणी केलेल्या शेतकर्यांची यादी वेगळी करून बाजार समितीकडून माघवण्यात आली आहे. अंबड तालुक्यातील शेतकर्यांची वेगळी सोय केल्यास कापूस खरेदी पूर्ण होईल यावेळी सहाय्यक निबंधक ए.जे भिल्लारे, सीसीआय कापूस खरेदी केंद्र प्रमुख पवन बोबडे, जिल्हा कार्यालयीन अधीक्षक (ओ.एस) शरद तनपुरे, बाजार समितीचे सचिव व्हि.एल.बाहेकर, राहून गुजर सहकर्मचारी यांची उपस्थिती होती.
Leave a comment