लॉक डाऊन असताना घेतली कामगारांची बैठक
पैठण । वार्ताहर
कामगारांच्या न्याय मागण्यासाठी न्यायमार्गाने तहसील कार्यालयावर काढण्यात आलेला मोर्चा तसेच कामगारांच्या थकीत देयकाबाबत साखर आयुक्त कडे करण्यात आलेल्या तक्रारीचा रोष धरून संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तुषार पाटील शिसोदे व भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास घेणारे सचिन घायाळ या दोघांनी संगनमताने विनापरवाना कारखान्यावर वीस ते पंचवीस कामगार जमाकरून कोणत्याही प्रकारची गेट सभा न घेता या कामगारांना हाताशी धरून पैठण तालुका साखर कामगार संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड केली आहे व नवीन कार्यकारिणीच्या निवडीस मान्यता दिली आहे .यामुळे कामगारात संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सध्या राज्यात कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण लॉक डाऊन चालू असल्यामुळे श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना मध्ये 23 मार्च2020 पासून कामगारांना पगारी रजेवर पाठवण्यात आलेले आहे त्यामुळे कारखान्यावर कामगार कर्मचारी यांची लॉक डाऊन च्या कालावधीत गेट सभा झाली नाही. तरीदेखील श्री संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन तुषार शिसोदे व भाडेतत्त्वावर कारखाना चालवण्यास घेतलेले सचिन या दोघांनी कामगार संघटनेत फूट पाडून आपल्या मर्जीतील कामगारांची नवीन कार्यकारणी निवडली आहे. व या नवीन कार्यकारिणी मान्यता दिली आहे हे आम्हाला मान्य नसल्याचे निवेदन अध्यक्ष रघुनाथ कळसकर ,उपाध्यक्ष शेख हमीद शेख अमीन, कोषाध्यक्ष द्वारकादास दिलवाले, चिटणीस सूर्यकांत भागवत, सहचिटणीस प्रकाश गव्हाणे, तज्ञ संचालक माणिकराव खरात, लक्ष्मण सपकाळ,सदस्य दामोदर थोरात, प्रकाश बर्डे, अशोकराव नलावडे, ए.के इरतकर, काकासाहेब धारकर,कोंडीराम दांडगे, दाऊत पठाण,आदींच्या स्वाक्षरी असलेले निवेदन प्रसिध्दी दिले आहे.
पैठण तालुका साखर कामगार युनियनचे अध्यक्ष रघुनाथ कळसकर यांच्या नेतृत्वाखालील युनियन कार्यकारिणीने सचिन घायाळ व संत एकनाथ सहकारी साखर कारखाना चेअरमन तुषार शिसोदे या दोन्ही व्यवस्थापनाच्या विरोधात कामगारांच्या मागणीसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता.यामध्ये सचिन घायाळ कडे कराराप्रमाणे 18 कोटी रुपये घेणे बाकी आहे. तसेच हंगाम 2014/ 2015 पासून सचिन घायाळ शुगर कडे कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम अंदाजे अडीच कोटी2.50 व कामगारांचे थकीत पगाराची रक्कम अंदाजे-21- एकवीस महिन्याची एवढी रक्कम थकीत असल्याने कामगार संघटना या रकमेची सतत मागणी करत असल्याने या द्वेषापोटी काही कामगारांना हाताशी धरून या दोन्ही चेअरमन यांनी कामगारांमध्ये फूट पाडून नवीन युनियन कार्यकारिणीच्या निवडीस मान्यता दिली आहे व लॉक डाऊन च्या काळात औद्योगिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न दोन्ही कारखान्यांच्या व्यवस्थापन करीत आहे.
* सचिन घायाळ कडून वरीलप्रमाणे रकमा वसूल करण्यासाठी कामगारांना विश्वासात न घेता चेअरमन तुषार पाटील शिसोदे यांनी सत्र न्यायालय औरंगाबाद येथे सचिन घायाळ सोबत नवीन करार केला.त्यामध्ये कामगारांच्या पगारासाठी प्रतिटन शंभर रुपये प्रमाणे देण्याचे ठरलेले असताना देखील पैसे दिले नाहीत म्हणून कामगार संघटनेने उच्च न्यायालय औरंगाबाद येथे सचिन घायाळ यांचे विरोधात अवमान याचिका दाखल केली आहे व कारखान्यातील भंगार विक्री च्या विरोधात आवाज उठल्यामुळे दोन्ही व्यवस्थापनाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत.
* दोन्ही व्यवस्थापनास साखर आयुक्त पुणे व सहकारी कामगार अधिकारी यांनी शीघ्र गतीने पगार करण्याचे आदेश दिले आहे तरीदेखीलदोन्ही चेअरमन लॉक डाऊन चे काळात कामगारांची पिळवणूक करत आहे असा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकार्यांनी व सदस्यांनी केला आहे.
Leave a comment