औरंगाबाद । वार्ताहर
गृहमंत्रालयाने देशातील रेड, ऑरेंज, ग्रीन झोनमधील दारूची दुकानांवरील निर्बंध उठवले आहेत. त्यामुळे आज देशभरातील अनेक दारुची दुकानं उघडली असून तळीरामांनी अगदी प्रथम कर्तव्य मानत दारू खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट करत याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. जलील ट्विटमध्ये म्हणतात, रेड झोनमध्येही दारुची दुकाने उघडण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे’. तसेच जर औरंगाबादमधील दुकाने उघडली, तर आम्ही लॉकडाऊनचे सर्व नियम तोडू आणि ही दुकाने जबरदस्तीने बंद करण्यास भाग पाडू. आम्ही बर्याच महिलांना रस्त्यावर येण्यास सांगू’, असा इशारा जलील यांनी आहे. दरम्यान, या कठीण काळात दारु विक्री करण्याची इतकी घाई का आहे? असा सवाल जलील यांनी उपस्थित केला आहे. मग सर्वच दुकानं सुरु करा ना, केवळ दारुच्या दुकानांनाच ही विशेष सूट का? असं जलील म्हणाले आहेत.
Leave a comment