पाचोड । वार्ताहर
महिन्यापासून देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे लाँकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे या कोरोनाव्हायरसचा विषाणू संसर्ग वाढु नये याकरिता प्रशासनाकडून कडे बंदोबस करण्यात आले आहे.यामुळे पोट भरण्यासाठी आलेले नागरिक आता इकडे तिकडे अडकून पडलेले आहे. यामुळे या नागरिकांच्या हाताला काम धंदे नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये याकरिता प्रशासनाने विविध संस्थांना जीवनावश्यक वस्तू देण्याचे आवाहन केले आहे.
मागील सहा महिन्यांपासून पाचोड येथील लॉकडाऊन मध्ये आडकलेल्या कृषी उत्पन बाजार समिती मोसंबी मार्केट मधील व पाचोडमधील जवाहर कनिष्ठ महाविद्यालय मध्ये सोनपेठ जिल्हा परभणी येथून पायी चालत आलेल्या 22 जणांना काँरटाईन करण्यात आलेल्या 5 कुटुंबांना असेच 300 कुटूबांना पाचोड येथिल ज्योती बहूसेवाभावी संस्थेच्या वतीने रोजी पाच किलो गहू तांदूळ सात किलो ,सोयाबीन तेल पुडा एक किलो, मीट,प्रविण पुडी, हळद पुडी,संतूर सांबणसह जीवन आवश्यक वस्तुची किट या नागरिकातून सोशल डिस्टंट पाळून यांना वाटप करण्यात आली आहे. यावेळी संस्थेचे सचिव लहु गायकवाड ,मंडळ अधिकारी एन.डी.बहुरे., तलाठी चंदेलसिंह ठाकुर,विक्की गायकवाड आदी उपस्थिती होती.
Leave a comment