एन 95 मास्कही देण्यात येणार
सिल्लोड । वार्ताहर
कोरोना विषाणूच्या लढ्यात एक योद्धा म्हणून काम करणार्या सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना शिवसेनेच्या वतीने तसेच शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या सौजन्याने पीपीई किटचे वाटप करण्यात आले. दुसर्या टप्यात डॉक्टर व कर्मचार्यांना 500 एन 95 मास्क देण्यात येणार असल्याची माहिती चंद्रकांत खैरे यांनी यावेळी दिली. मंगळवार (दि.5) रोजी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात सदरील पीपीई किट वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे , महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, शिवसेना जिल्हा उपप्रमुख रघुनाथ चव्हाण, शिवसेना युवा नेते अब्दुल समीर, शिवसेना तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल,नगराध्यक्षा राजश्री निकम, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुदर्शन अग्रवाल ,निराधार योजनेचे अध्यक्ष राजेंद्र ठोंबरे,शिवसेना तालूका उपप्रमुख रघुनाथ घरमोडे, युवा सेना शहर प्रमुख शिवा टोम्पे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य मोहम्मद हनीफ, दिपाली भवर, दशरथ बर्डे आदींची उपस्थिती होती. दरम्यान 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण ही शिवसेनेची कायमच भूमिका राहिलेली आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आज कोरोनाच्या संकटात ज्या पद्धतीने काम करीत आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, सर्व आघाडीचे प्रमुख, शाखाप्रमुख कोरोनाच्या संकटात मदत व सहकार्य करीत असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे म्हणाले.
सिल्लोड मध्ये आतापर्यंत कोरोनाचा रूग्ण आढळलेला नाही. यासाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे प्रभावी नियोजन महत्त्वाचे ठरत आहे . कोरोनाच्या लढाईमध्ये राज्यमंत्री अब्दुल सत्तार सामन्यांना करीत असलेली मदत गरजूंना आधार देत असल्याचे प्रतिपादन श्री खैरे यांनी याप्रसंगी केले. कोणाच्या संकटात शिवसेना व युवासेना च्या वतीने गरजू नागरिकांना करण्यात येत असलेली मदत ,नगरपरिषद तसेच प्रशासनाच्यावतीने कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती ना. अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी दिली . तर कोरोना विषाणूच्या लढाईत एक योद्धा म्हणून डॉक्टर परिचारिका व कर्मचार्यांचे काम असून या कार्याचे उपस्थितांनी टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
Leave a comment