भराड़ी । वार्ताहर
सिल्लोड तालुक्यातील सराटी परिसरातील गट नंबर 15 मध्ये अचानक पेट घेतल्याने शेतीपयोगी औजारांसह जनावरांसाठी भरुन ठेवलेला चारा - भूस शेतीपयोगी औजार जळून खाक झाल्याने सराटी - बोदवड येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार मिञमंडळाचे वतीने त्या शेतक-यास जनावरांचा चारा भेट देण्यात आला आहे. सराटी येथील शेतकरी एकनाथ ञ्यंबक बनकर हे आपल्या शेतामध्ये खरीपपुर्व मशागती कामांसाठी गेले असता शेतातील धसकटे गचपन पेटविण्याचे काम सुरु होते. शेतीमशागत कामे सुरु असतांनाच त्यांच्या लोखंडी शेड मधून बाहेर धूर निघत अग्नीच्या तांडवाने चारा - भुसासह शेतीपयोगी औजारांची राखरांगोळी झाली.
खरिपपुर्व शेती मशागती कामे करीत असतांनाच सदरील शेतक-यावर आर्थिक संकट कोसळल्याने सराटीसह - बोदवड येथील राज्यमंत्री अब्दुल सत्तार मिञमंडळाचे सर्कल प्रमुख लक्ष्मण पाटील गव्हाणे यांनी सदरील शेतकरी एकनाथ ञ्यंबक बनकर यांच्या जनावरांसाठी चारा भेट देऊन एकप्रकारचा आर्थिक दिलासाच दिला आहे. यावेळी संतोष लहाने, अनिल गुळवे, चंद्रशेखर गुळवे, गणेश गव्हाणे, नाना गव्हाणे, राहुल गव्हाणे, योगेश गुळवे, सुनिल गुळवे, कृष्णा घायवट, कौतिक सहाणे, आदिंसह नागरिकांची उपस्थिती होती.
Leave a comment