एक लाखाचा ऐवज लंपास,गोंदी पोलिसांची निष्क्रियता भावली
तिर्थपुरी । वार्ताहर
घनसावंगी तालुक्यातील गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीत तीर्थपुरी येथील अत्यंत रहदारीच्या व मुख्य मार्केट बाजारपेठेच्या ठिकानी असलेल्या ओमकार प्रोव्हिजन या किराणा दुकानात तील चोरट्यांनी रोख 50 हजारा सह किराणा दुकानातील सामान असा एकूण एक लाख रुपये दहा हजार ऐवज चोरट्यांनी लॉक डाऊन संचार बंदीच्या काळात पोलीस बंदोबस्तात असतानाही चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांना एक प्रकारची आव्हानच केल्यामुळे या परी वर्गात एकच खळबळ माजली ही घटना काल दि 4 रोजी रोजी मध्यरात्री घडली.
सविस्तर माहिती अशी की साडेगाव येथील व्यापारी बद्रीनाथ नानासाहेब धोडरे यांचे तीर्थपुरी येथील शहागड रोड वरील मुख्य बाजारपेठ व बस स्थानक रहदारीच्या ठिकाणी ओमकार किराणा दुकान असून या दुकानाच्या शेजारीच प्रियदर्शनी बँक सिद्धेश्वर मशनरी दुकान व समोरच समर्थ सहकारी साखर कारखाना कार्यालय असताना या किराणा दुकानात चोरट्यांनी वरील पत्राच्या रिपीट तोडून पत्र उचकटून वरून आत प्रवेश केला तसेच चोरट्यांनी सोमवार रोजी लॉक डाउन संचारबंदी काळात दुपारी दोन वाजेपर्यंत किराणा दुकान बंद करून गेले असताना चोरट्यांनी दुकानांमध्ये फेरन लवली संतूर साबण बॉक्स चहा पत्ती बॉक्स जीमेल इ एक लिटर तेल बॉक्स असा मिळून 60 हजार रुपये किमतीचा चोरट्यांनी गल्यातील नगदी 50 हजाराची रोकड रुपये एकूण असा एक लाख दहा हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी कळविला असून एक तर लोक डाऊन संचार बंदीच्या काळात तीर्थपुरी पोलीस चौकी ची अधिकारी पोलिस कर्मचारी बंदोबस्तात असतानाही आणि एवढ्या मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी दुकान फोडून पोलीस एक प्रकारची आव्हानच केली यामुळे व्यापारी वर्गात उलट-सुलट चर्चा सुरू असून अज्ञात चोरट्याविरुद्ध गोंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
Leave a comment