मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून लोणीकर यांनी साधला ग्रामीण भागातील जनसामान्यांशी संवाद

जालना । वार्ताहर

कोरोना प्रादुर्भावाचा काळात संपूर्ण महाराष्ट्र लोक घेऊन असताना ग्रामीण भागासह शहरी भागात अनेक अडचणींचा सामना सर्वसामान्य नागरिकांना करावा लागत आहे अशा परिस्थितीमुळे ग्रामीण भागात तोरणा प्रादुर्भाव बाबत ङ्गार गांभीर्याने घेतले जात नाही ही बाब अत्यंत चिंतेची असून ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचं मत बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले मोबाईल अ‍ॅपद्वारे व्हिडीओ कॉन्ङ्गरन्स घेऊन माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी आज ग्रामीण भागातील जनसामान्यांशी संवाद साधला सर्कल निहाय घेण्यात आलेल्या या कॉन्ङ्गरन्समध्ये जालना तालुक्यातील नेर व सेवली तर परतूर तालुक्यातील श्रीष्टी व वाटुर जिल्हा परिषद सर्कलचा समावेश करण्यात आला होता गावातील तरुण मंडळीसह वयोवृद्धांच्या देखील या कॉन्ङ्गरन्समध्ये समावेश होताग्रामीण भागातील अनेक लोक पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबई पुणे पिंपरी-चिंचवड नाशिक औरंगाबाद नगर पनवेल इत्यादी ठिकाणी स्थलांतरित झाले असून संपूर्ण लोक दावून असल्याकारणाने या स्थलांतरित लोकांचा काम धंदा पूर्णतः ठप्प झालेला आहे त्यामुळे या शहरात स्थलांतरित झालेल्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली असून त्यांनी आता आपल्या मूळ गावी परत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत त्यामुळे ग्रामीण भागात राहणार्‍या नागरिकांनी सतर्क राहण्याची अधिकाधिक गरज असून केवळ ग्रामीण भागातच नव्हे तर शहरी भागात देखील नागरिकांनी स्वयंशिस्त आणि सतर्कता राखण्याची गरज असल्याचे मत आमदार बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले सर्कल निहाय व गाव निहाय आढावा घेताना बबनराव लोणीकर यांनी ग्रामीण भागातील जनसामान्यांच्या सामान्यांच्या अनेक समस्या जाणून घेतल्या त्यामध्ये प्रामुख्याने पाणीपुरवठ्याबाबतची योजना यांचा समावेश आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवात असल्याकारणाने अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याचा सुरुवात झाली आहे त्यावर उपाययोजना म्हणून तात्काळ गटविकास अधिकार्‍यांना बोलून ग्रामीण भागात पाणीटंचाई येण्यापूर्वी उपाययोजना तयार असेल असे लोणीकर यांनी गावकर्‍यांना आश्‍वासन दिले करुणा प्रादुर्भाव काळात सामाजिक अंतर राखून सर्व व्यवहार करण्याबाबतची सूचना आमदार बबनराव लोणीकर यांनी नागरिकांना केली पंतप्रधान किसान सन्मान योजना अंतर्गत शेतकर्‍यांना त्यांच्या खात्यावर केंद्र सरकारने पाठवलेली रक्कम मिळाली किंवा नाही याबाबतची चौकशी देखील लोणीकर यांनी यावेळी केली ज्या गावांमध्ये पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे रक्कम पोहोचली नाही त्या गावा बाबत संबंधित बँकांना बोलून लवकरात लवकर ती रक्कम पोच करण्याबाबत देखील लोणीकर यांनी यावेळी स्पष्ट केले संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल मे व जून या तीनही महिन्याचे मानधन एकत्रित देण्यात यावे याबाबत बबनराव लोणीकर यांनी माननीय राज्यपाल यांच्याकडे विनंती केली होती व त्यानुसार या सर्व 34 लक्ष लाभार्थ्यांना निराधार योजनेचे एकत्रित मानधन देण्याचा निर्णय सरकारला घ्यावा लागला यात भर म्हणून केंद्र सरकारने देखिल विशेष अनुदान म्हणून एक हजार रुपये प्रत्येकी असे मानधन निराधारांना दिले या माध्यमातून करुणा प्रादुर्भावाचा काळात निराधारांचा पाठीशी बबनराव लोणीकर खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र दिसून येते या माध्यमातून अनेकांना कोरोना लढाईच्या काळात मदत झाली आहे त्यामध्ये निराधार व वृद्ध विधवा अंध-अपंग परित्यक्ता घटस्ङ्गोटित दुर्धर आजाराने ग्रस्त अशा अनेकांचा समावेश आहे करुणा प्रादुर्भाव च्या काळात पीएम केअरला मदत करण्यात आली किंवा नाही गावागावात रक्तदात्यांची यादी तयार करणे आरोग्य सेतू प डाऊनलोड करणे कोरोना वॉरियर ची गाव निहाय निवड करणे इत्यादी बाबतीत देखील आमदार बबनराव लोणीकर यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या करुणा प्रादुर्भावाचा काळ कठीण असला तरीदेखील आपण सर्वजण घरात राहून कोरोनावर विजय मिळू शकतो त्यामुळे प्रत्येकाने घरामध्ये बसूनच धोरणाविरुद्ध की लढाई सक्षम पणे लढावी अशी अपेक्षा यावेळी लोणीकर यांनी व्यक्त केली. या कॉन्ङ्गरन्समध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे जालना व परतूर तालुका अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सर्कलमधील विविध गावांचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील भारतीय जनता पार्टी चे पक्ष पदाधिकारी कार्यकर्ते व गावातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.