बाजारपेठेत वाढीव भावाने मालाची होते आवक,त्यामुळं वस्तूंचे होते चड्या भावाने विक्री
कुंभार पिंपळगाव । वार्ताहर
एकी कडे कोरोनाच्या महामारीच्या संकटाने जनता भयभीत झाली आहे . देशासह कोरोनाव्हायरसची राज्यातही संख्या वाढतच आहे .त्यामुळे आणखीन लॉक डाऊन वाढण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही .यामुळे सर्वसामान्य कुटुंबावर पुन्हा एकदा उपासमारीचे संकट कोसळलं आहे. कोरोना व्हायरस पासुन बचावासाठी पर्याय म्हणुन सरकारने जनता कर्फ्यूव जाहीर करून पहिल्या टप्प्यात जनतेला रोखले .टप्प्या टप्पायाने संचार बंदी आदेश काढून लॉकडाऊन केले.अत्यआवश्यक सेवा वगळता पुर्ण बाजार पेठा बंद केल्या .तिस-या टप्पात लॉकडाऊन जाहिर करून काहीशी शिथीलता ग्रीन व ऑरेंज झोन मध्ये देण्याचा निर्णय झाला. सर्व सामान्य जनतेची होरपळ होत असल्याने शासनाने मजुराना काम लागावे म्हणून लॉकडाऊंच्या तिसर्या टप्प्यात काही,शेतीशी निगडीत,कारखाने सह काही व्यवसायिक धंद्यांना सूट दिली असून बांधकाम मटेरियल व बांधकामाणा लागणारे साहित्य अनेक दुकानदार कोरोनाची संधी साधून मनमानी भावात चडल्या भावात विक्री करत आसल्याचे ग्राहाकांन मधून दबक्या आवाजात चर्चा ऐकल्यास येत आहे.यामुळे बांधकाम चालू करण्या ऐवजी पुन्हा ठप्प झाले आहे. मग शासनाने सूट देऊन उपयोग काय ? मिस्त्री व बांधकाम मजुरांवर उपासमारीची वेळ कायम आहे.
लॉकडाऊंनच्या पूर्वी बांधकाम साहित्याच्या किमंती सिमेंट 330 रुपये पर बॅग किंमत होती आज सिमेंटची पर बॅग 390- 400 चारशे रुपये विक्री होऊ लागली आहे. बांधकामासाठी लागणारे लोखंड गज पूर्वी 4200 रुपये क्विंटल होते आज 4800 ते 5000 पाच हजार रुपये क्विंटल लोखंड भाव आहे यामुळे बांधकाम सुरू होत नसल्याने बांधकाम मिस्त्री व मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे किराणामध्ये होलसेलचे रेट वाढल्याने किरकोळ विक्रेत्यांनी ग्रामीण भागात ऑनने माल विक्री करावा लागत आहे. आज खेड्यात गावात ङ्गेब्रुरवारीच्या शेवटच्या आठवड्यात जे शेंगदाणे 80 ते 90 रू किलो होते ते आज दोनच महिण्यात 130 रू प्रमाने विक्री होत आहे. 5 रू मिळणारा बिस्कीटचा पुढा 6 रू झाला होलसेल दुकानदार 65 रू रॅपर चे पैसे घेत आहे. साखर 33 रू होती, आज 38 ते 40 , तेल , 95 ते 100, गुळ 40 ते 50 , गाय छाप 15 रू आज 40 रू सुर्यछाप 5 रू आज 15 रू सुपारी 300 रू आज 600 रू किलो जवळपास सर्वाच वस्तुंचे भाव वरूनच वाढत आहेत. त्यामुळे खालच्या व्यापांर्यांचा नाविलाज झाला आहे. अनेकजण खर्च बारकीयेने करून नियोजन करत आहे.परंतु अचानक वाढत्या महागाईने ते नियोजन कोलमडत आहे. मुलं बाळं उपाशी राहू नये म्हणुन जास्तीची खरेदी करून माल घेत आहेत .जास्तीची खरेदीवर पुर्वी सुट दिली जात होती परंतु बंदीचे कारनं पुढे करत मालच मिळत नसल्याचे सांगून दुकानदाराकडून दर कमी केले जात नाहीत. या मुळे सर्व सामान्यांना अर्थीक भुर्दंड सहन करावा लागत आहे. होलसेल व्यापार्यांना योग्य भावात माल मिळावा जेने करून सर्व सामान्यांना रास्त भावात माल मिळेल असे ग्राहाकांनी म्हणटले आहे. शेतकर्यांच्या मालाला मात्र भाव मिळत नाही.
Leave a comment