जालना । वार्ताहर
जायकवाडी प्रकल्पाचे डाव्या कालव्यातुन दि.22 एप्रिल 2020 पासून पाणी सोडण्यात आले परंतु डीस्चार्ज कमील असल्याने कार्यक्षेत्रातील सर्व चार्यांना लगेचच पाणी सोडता आले नाही. अंबड व घनसावंगी तालुक्यातील शेतकर्यांची सातत्याने आग्रही मागणी होती की, शेतीसाठी चार्यांना पाणी सोडण्यात यावे. आज रोजी जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता आर.पी.काळे यांचेशी व संबंधित वरिष्ठ अधिकार्यांशी ङ्गोनवर प्रत्यक्ष संपर्क करुन चारी क्र.12 ते 34 पर्यंत सर्व चार्यांना पाणी सोडण्याच्या सुचना दिल्या.
याची अंमलबजावणी तात्काळ करण्यता येईल असे संबंधित अधिकार्यांना सांगितले. त्यानुसार सर्व शेतकर्यांनी रब्बी पिकांना व इतर उन्हाळी हंगामातील पिकांना पाणी द्यावे, परंतु पाण्याचा काटकसरीने वापर करुन पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.
Leave a comment