जालना जिल्ह्यातुन राज्यातील इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 680 नागरिकांना पास उपलब्ध
जालना । वार्ताहर
जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी 5391नागरीकांचे ऑङ्गलाईन पासेस संबंधित तहसिल कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 680 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. दि. 1 मे 2020 रोजी राज्य राखीव पोलीस गट क्र.3 मधील जे चार जवान पॉझिटिव्ह आढळुन आले होते. या चार पैकी दोन जवान कुणाच्याही संपर्कात न येता जिल्हा सामान्य रुग्णालयात,दाखल झाले होते. तर 300 क्वार्टर राज्य राखीव पोलीस बल येथे राहणा-या एका जवानाच्या संपर्कात आलेल्या तीन व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. तर उर्वरीत एक जवान चौधरीनगर परिसरात राहणारा होता त्याच्या संपर्कात आलेल्या सात व्यक्तींचे स्वॅब निगेटिव्ह प्राप्त झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.
पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3 च्या ज्या 119 जवानांचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले होते. त्यापैकी 94 जवानांच्या 14 दिवसांचा अलगीकरणाचा कालावधी पुर्ण झाला असुन व त्यांचे दोन स्वॅब (सात दिवसाच्या अंतराचे) प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह प्राप्त झाल्याने त्यांना पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथुन सुट्टी देऊन होम क्वांरटाईन करण्यता आले आहे. संबंधित जवानांनी कुणाच्याही संपर्कात न येता घरीच थांबावे अशा सुचना देण्यता आल्या आहेत. तसेच त्यांच्याकडुन आरोग्य सेतु प मोबाईमध्ये डाऊनलोड करुन त्यांची संपुर्ण माहिती अद्यावत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात एकुण 1156 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 43 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 770 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 13 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1087 एवढी आहे. दैनिक पॉझिटीव्ह नमुने -00 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या 08 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1059, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 228, एकुण प्रलंबित नमुने-16 तर एकुण 727 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या 19, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 440 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या निरंक , सध्या अलगीकरण केलेल्या व्यक्ती-212, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-05, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या 43, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या 95, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 257 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे. कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 212 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास मुलांचे शासकीय वसतीगृह, जालना 48, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह-41, मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-26, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-28, पोलीस प्रशिक्षण केंद्र-25, परतुर-35, जाङ्ग्राबाद-6 तर भोकरदन येथे 03 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन इतर राज्यात जाण्यासाठी 5391 नागरीकांचे ऑङ्गलाईन पासेस संबंधित तहसिल कार्यालयाकडे वर्ग केले आहेत. तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 680 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
Leave a comment