जालना । वार्ताहर
अ. भा. वीरशैव युवक संघटनेने उत्कृष्ट गांवाचा शाखा पुरस्कार देऊन गौरविलेल्या श्रीक्षेत्र राजूर येथील शिवा संघटनेच्या पदाधिकार्यांनी समता नायक महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबीर घेऊन त्यांची जयंती साजरी केली. कोरोना हा संसर्गजन्य आजार आणि लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम पाळून क्रांतिसुर्य जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या 889 व्या जयंती निमित्ताने शिवा अ. भा. वीरशैव युवक संघटनेच्या श्रीक्षेत्र राजुर गणपती शाखेच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. या शिबीरात संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री. कैलास गबाळे यांच्यासह तब्बल 42 रक्तदात्यांनी रक्तदान केले. संपूर्ण देश कोरोणाशी लढत असताना जो तो आपापल्या परीने प्रशासनास सहकार्य करीत आहे अशा परिस्थितीत सामाजिक भान जपत शिवा संघटनेच्या राजुर गणपती शाखेने सतत तिसर्या वर्षीही जनकल्याण रक्तपेढी यांचे सहकार्याने भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले होते.
प्रा.मनोहर धोंडे यांच्याकडून कौतुक शिवा संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मनोहर धोंडे यांनी ङ्गोनद्वारे राजुर गणपती शाखेचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की शिवा संघटना जालना जिल्हा आणि त्यातही श्रीक्षेत्र राजुर गणपती शाखा समाज हिताच्या कार्यात सदैव अग्रेसर राहिलेली आहे. संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कैलास गबाळे, संपर्कप्रमुख सतीषअप्पा तवले यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत नियोजनबद्ध पध्दतीने आणि सोशल डिसटिंग पाळुन सुंदर नियोजन केल्याबद्दल आपण या सर्वांचे अभिनंदन करत आहोत. या रक्तदान शिबीरात शिवा संघटनेचे जिल्हाप्रमुख कैलास गबाळे, शुभम दारुवाले, गणेश आप्पा हिंगमीरे, कमांडो पद्माकर चंदनशिवे, विष्णु सातभाये, विकास तवले, श्याम बोरबळे, संदीप देशमाने अ. देव, समाधान गवळी, सदाशिव तवले, अक्षय खुरपे,गणेशअप्पा दारुवाले, संदिप मडके, विजय हिंगमीरे, प्रदीप दारुवाले, शैलेश देशमाने, गजानन डांगे, कैलास आप्पा दारुवाले, आशुतोश दारुवाले, स्वप्निल दारुवाले, भीमाशंकर दारुवाले, भगवान पुंगळे, सोमनाथ कदम, संतोश देशमाने, स्वप्निल हाजबे, गणेश ङ्गुटाणकर, मयुर हाजबे, शुभम हाजबे, सोमनाथ हाजबे, रविअप्पा हिंगमीरे, संदिप वैद्य, समाधान डवले,सोमेश तवले, राम आप्पा कोमटे, चंदु ङ्गुलसुंदर, संदिप दारुवाले, गणेश तोडकर, केशव नागवे, अंकुश डवले, रावसाहेब पुंगळे, सोहनसिंह शेखावत, जसवंतसिंह शेखावत आदींनी रक्तदान केले.
Leave a comment