जालना । वार्ताहर
कोरोना प्रतिबंधक उपाय योजना करताना शेतकर्यांना भेडसावणार्या वीज प्रश्नांची ना टोपे यांनी दखल घेऊन धवजारोहन कार्यक्रमानंतर तात्काळ महावितरण च्या अधिकार्यांना बोलावून वीज प्रश्नांचा आढावा घेतला.यावेळी कोरोनामुळे शेतात राहायला गेलेल्या नागरिकांना गावठाण चा वीज पुरवठा व्हावा म्हणून या माध्यमातून सिंगल ङ्गेजचा वीज पुरवठा उपलब्ध करण्या च्या सूचना दिल्या.
तिर्थपुरी, साडेगाव, कु पिंपळगाव, शिवणगाव, गोंदी ,पाथरवाला येथील 33 केव्ही उपकेंद्रात अतिरिक्त पॉवर ट्रान्स्ङ्गरमर्स बसविण्यात येऊन विजेचा शॉर्टङ्गॉल कमी करणे साठी उपाययोजना कराव्यात अशा सूचना या वेळी ना टोपे यांनी दिल्या.गोंदी ते साडेगाव दरम्यान 11/33 केव्ही ची लिंक लाईन टाकून 132 वरील सतत च्या ब्रेक डाउन मुले होणारा त्रास कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. ङ्गिल्टर युनिट मध्ये ट्रान्स्ङ्गरमर्स बदलून देताना शेतकरी आणि नागरिक यांची होणारी लुबाडणूक तात्काळ थांबावी म्हणून तेथील सर्व लेबर आणि स्टाङ्ग बदलून देण्याच्या सूचना श्री टोपे यांनी दिल्या.घनसावंगी आणि अंबड तालुक्यातील अनेक कृषिपंप वाहिन्या वरील लोड वाढल्या मुळे शेतकर्यांना त्रास होतोय,हा लोड कमी करण्यासाठी स्वतंत्र लिंक टाकून सदर कृषी पंप वहिनी वरील लोड कमी करून योग्य दाबाने वीज पुरवठा करण्यासाठी आवश्यक ते पाऊल उचलले पाहिजे असे आदेश ना टोपे यांनी दिले.
Leave a comment