जालना । वार्ताहर

लॉकडाऊनमूळे देशभरातील जवळपास सर्वच क्षेत्रात मोठी अडचण निर्माण झाली आहे. खास करून दररोज मोलमजुरी करणार्‍या वर्गाची मोठी अडचण झाली असून अशा वर्गाची अडचण लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले असून याचा देशातील 80 कोटी जनतेला लाभ झाला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय राज्यमंत्री तथा भाजपचे जेष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी येथे बोलतांना केले.याचवेळी श्री दानवे पाटील यांच्या हस्ते नीलकंठ नगर भागात उभारण्यात आलेल्या स्व.मनोहरराव पांगारकर स्मृती उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. भाजपचे गटनेते तथा भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अशोकअण्णा पांगारकर यांच्या वतीने गरीब व गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी श्री दानवे पाटील बोलत होते.याप्रसंगी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष भास्करराव दानवे पाटील, शहराध्यक्ष राजेश राऊत,माजी शहराध्यक्ष सिद्धिविनायक मूळे, नगरसेवक सतीश जाधव,शशिकांत घुगे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे,नगरसेवक विजय पांगारकर, आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी आपल्या भाषणात पुढे बोलतांना श्री दानवे पाटील म्हणाले की, कोरोनामुळे जागतिक पातळीवर मोठे संकट उभे राहिले आहे. आपल्या देशात देखील जवळपास सर्वच क्षेत्रात अडचणी निर्माण झाल्या असून दररोज मोलमजुरी करून कुटूंबाचा उदरनिर्वाह भागविणार्या वर्गाची विशेषतः मोठी अडचण झाली आहे. जगात सव्वा दोनशे पेक्षा अधिक देश असून अमेरिका,रशिया, आदी प्रगत देशांना कोरोनामुळे मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येते आहे. मात्र आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता संचारबंदी, लॉकडाऊन सारखे महत्त्वाचे निर्णय घेऊन या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात आपण बर्‍यापैकी यशस्वी झालो आहोत असे सांगून श्री दानवे म्हणाले की, लॉक डाऊन मुळे गोर गरिबांची होत असलेली उपेक्षा लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहे. गोरगरीब शिधापत्रिका धारकांना 2 रुपये किलो गहू आणि 3 रुपये किलो दराने तांदूळ उपलब्ध करून देण्यात आला असून याव्यतिरिक्त 5 किलो तांदूळ अतिरिक्त वाटप करण्यात आले आहे. याचा देशातील तब्बल 80 कोटी जनतेला लाभ झाला आहे. कोरोनाच्या संकट काळात केंद्र सरकारने भरीव असे पेकेज जाहीर करून सर्व क्षेत्रातील घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. पंतप्रधान उज्वला ग्यास योजनेअंतर्गत तीन महिने संबधित लाभार्थींना मोङ्गत सिलेंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून शेतकरी, वृद्ध, अपंग,निराधाराना तीन महिने प्रत्येकी एक हजार रुपये देण्याचा निर्णय घेऊन अशा घटकाला देखील न्याय दिला आहे. जालना जिल्हा भाजपाने देखील कोरोनाचे संकट लक्षात घेऊन जिल्ह्यात 50 टन धान्याचे किट वाटप केले आहे.तीन लाख मास्क,तीस हजार स्यानिटायझर बॉटल वाटप केल्या आहेत. नगरसेवक अशोकअण्णा पांगारकर यांनी प्रभागातील गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्याचा राबविलेला उपक्रम कौतुकास्पद आहे असेही श्री दानवे शेवटी म्हणाले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र बावकर यांनी मानले.यावेळी उद्यान विकसित करण्यासाठी परिश्रम घेतल्याबद्दल युवराज कुलकर्णी यांचा दानवे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास रमेश कपूर,धीरज मेवाडे, अशोक उबाळे,दत्ता जाधव,रवींद्र व्यास,दीपक दुमाणे,संतोष वाजगे,रमेश गायकवाड, सुनील पांगारकर, विजय बावकर, नंदकिशोर कक्कड,रामराव मगर,भगवान पुराणिक,प्रतीक पांगारकरयांच्यासह नागरिक,महिला,युवक कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

हजार कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूच्या किटचे वाटप=पांगारकर 

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर अडचणीत सापडलेल्या गरजू व्यक्तींना मदत करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन आपल्या प्रभागासह विविध परिसरातील जवळपास एक हजार पेक्षा अधिक गरजू कुटुंबातील व्यक्तींना गहू,तांदूळ,पीठ,तेल,साबण,साखर इत्यादी जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले असल्याचे नगरसेवक अशोक अण्णा पांगारकर यांनी प्रास्ताविक करतांना सांगितले. असे संकट आपण यापूर्वी कधी पाहिले नाही.गरीब परिस्थतीतून आपण आणि आपल्या कुटुंबाने संघर्षाचा सामना करत यशाचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला.गरिबीची जाणीव असल्यामुळे आपण हा उपक्रम हाती घेतला असून भविष्यात देखील गोरगरिबांना मदत करण्यासाठी तत्पर राहणार असल्याचे श्री पांगारकर यांनी सांगितले.

Leave a comment

Filtered HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <blockquote> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

Full HTML

  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.

Plain text

  • No HTML tags allowed.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Lines and paragraphs break automatically.