घनसावंगी । वार्ताहर
महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री मा.ना.राजेशभैय्या टोपे साहेब यांनी कोरोना पार्श्वभूमीवर मतदार संघातील आरोग्य विभाग,जि.प.,पं.स.व नगर पंचायतविभागाच्या आधिकार्यांना आणि पदाधिकारी यांना बोलावून सोशल डिस्टिंक्शन पाळून स्वतंत्र चर्चा करुन आढावा घेतला.
यावेळी आरोग्यमंत्री ना.राजेश टोपे म्हणाले की,मतदार संघातील व्यवसायासाठी पुणे,मुंबई,औरंगाबाद व नाशिक आदी ठिकाणी गेलेल्या नागरीकांना आणण्यासाठी तहसील व संपर्क कार्यालय यांनी मदत करणेबाबत सुचना दिल्या.तसेच ऑनलाईन पास बाबत लोकांना मदत करणे,मतदार संघातील गाव,तांडा व वस्तीमध्ये एखाद्या नागरीकाला काही कोरोना संदर्भातील लक्षण असल्यास गावातील नागरीकांनी तात्काळ तहसील व संपर्क कार्यालय येथे कळवावे,कोणी अंगावर दुखने काढून आपल्या परिवारासह गावातील नागरीकांना त्रास होईल असे कोणीही करु नये असे आवाहन आरोग्यमंत्री यांनी केले
Leave a comment